शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:10 IST

राजा रघुवंशी हत्याकांडाच्या तपासात आता एक नवा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे.

इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्याकांडाच्या तपासात आता एक नवा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. सोनमचा प्रियकर राज कुशवाह याच्याबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, राजाला सुरुवातीला गोळी मारून संपवण्याचा कट रचण्यात आला होता. यासाठी राजला ५ लाख रुपये देण्यात आले होते, ज्यातून त्याने पिस्तूल खरेदी केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पैसे अन्य कोणी नसून सोनमनेच राजला दिले होते. मात्र, पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

सोनमने यापूर्वी सांगितले होते की, त्यांना फक्त राजाला घाबरवायचे होते. पण आता समोर आलेल्या या माहितीवरून हे स्पष्ट होते की, तिला राजाला मारायचेच होते. तिने यासाठी तीन वेगवेगळे कट रचले होते. पहिला कट राजाला गोळी मारून ठार मारण्याचा होता. दुसरा, सेल्फीच्या बहाण्याने त्याला दरीत ढकलून देण्याचा, आणि तिसरा, धारदार शस्त्राने राजाचा जीव घेण्याचा होता. पहिले दोन कट अयशस्वी झाले, परंतु तिसरा कट तिचा यशस्वी ठरला.

हत्येचा दिवस आणि सोनमची क्रूरताआनंद कुर्मी, आकाश राजपूत आणि विशाल चौहान या तीन आरोपींनी राजावर हल्ला करून त्याची हत्या केली. यावेळी सोनम स्वतः तिथे उभी राहून हा सर्व प्रकार पाहत होती. एवढेच नाही, तर ती ओरडून 'याला मारून टाका' असे म्हणत होती. नंतर तिने राजाच्या पर्समधून पैसे आणि सोन्याची चेन व अंगठी काढून आरोपींसोबत तिथून पळ काढला. राजाचा मृतदेह त्यांनी दरीत फेकून दिला.

अखेर सोनमचा पर्दाफाश आणि पोलीस तपासमात्र, लवकरच सोनमचा हा कट उघड झाला. आता ती पोलीस कोठडीत आहे. पाचही आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दुसरीकडे, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या शिलाँग पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. सोनमच्या इंदूरमधील घरापासून ते हत्याकांडांनंतर गाझीपूरला परतण्यापर्यंतच्या सर्व ठिकाणांचे फुटेज तपासले जात आहेत. इंदूर आणि मेघालयमधील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करून संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.

व्हिडिओतून महत्त्वाचे धागेदोरेसूत्रांनुसार, शुक्रवारी पोलीस हॉटेलमधून बाहेर पडून तपासात सक्रिय नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, मेघालय पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामला पत्र लिहून ब्लॉगर देव सिंहने पोस्ट केलेल्या दोन व्हिडिओंची माहिती मागवली आहे. घटनेनंतर पहिला व्हिडिओ १६ मे रोजी पोस्ट करण्यात आला होता, ज्यात सोनम पांढऱ्या टी-शर्टमध्ये राजाच्या पुढे डोंगर चढताना दिसत आहे. हेच टी-शर्ट नंतर घटनास्थळाजवळ सापडले होते. सोनमच्या हातात एक पॉलिथिन बॅग देखील होती, ज्यात रेनकोट असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी ब्लॉगरने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात आरोपी आनंद कुर्मी, आकाश राजपूत आणि विशाल चौहान हे तिघे रघुवंशी दाम्पत्याच्या मागे जाताना दिसले.

तीन मोबाईल अजूनही बेपत्ता२० मे रोजी राजा आणि सोनम हे दाम्पत्य हनीमूनसाठी इंदूरहून आसामला निघाले होते. २१ मे रोजी ते शिलाँगला पोहोचले. सुरुवातीला राजा आणि सोनम बेपत्ता असल्याचे सांगितले जात होते. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडल्यानंतर हे प्रकरण खुनाच्या तपासात बदलले. ७ जूनच्या रात्री सोनमने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि तिला ताब्यात घेण्यात आले. तपासात असे समोर आले आहे की, सोनम आणि राजाकडे चार मोबाईल होते, त्यापैकी तीन सोनमचे होते. हत्येनंतर तिने राजाचा फोन तोडून फेकून दिला. सोनमचे उर्वरित तिन्ही मोबाईल अद्याप पोलिसांना मिळालेले नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूhusband and wifeपती- जोडीदार