शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फिल्म डायरेक्टरवर रोखली पिस्तूल; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 20:07 IST

फिल्म डायरेक्टरने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चारही जणांविरुद्ध वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्दे मीरा रोड येथील सृष्टी काँप्लेक्स मध्ये राहणारे श्रेय सतीश श्रीवास्तव (44) हे फिल्म डायरेक्टर आहे. मारहाण करून पिस्तूल रोखलेल्या आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांची विरार पोलिसांनी पाठराखण केल्याचा आरोपही श्रेय श्रीवास्तव यांनी केला आहे. 

नालासोपारा - मुंबई - अहमदाबाद महामार्गावर एका हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे एकाने फिल्म डायरेक्टरवर पिस्तूल राखून त्यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. फिल्म डायरेक्टरने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चारही जणांविरुद्ध वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. मीरा रोड येथील सृष्टी काँप्लेक्स मध्ये राहणारे श्रेय सतीश श्रीवास्तव (44) हे फिल्म डायरेक्टर आहे. यांचे नातेवाईक विनीत श्रीवास्तव कडून अमित पराशर यांनी काही पैसे घेतले होते पण ते पैसे परत करत नव्हते. याच विषयावरून 22 एप्रिलच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अमित ने विनीत याला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार येथील हिल व्ह्यू हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते यावेळी विनीत सोबत फिल्म डायरेक्टर श्रेय श्रीवास्तव आले होते. पैश्याच्या देवाणघेवाणी वरून अमित आणि विनीत यांच्यात वादविवाद सुरू झाल्यावर श्रेय याने मध्यस्थी करून शांत करण्याचा प्रयत्न केला. अमित सोबत असलेले केशव मामा, शिवा आणि मन्या हे तिघे होते. या चौघांनी मिळून श्रेय यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व शिवाने त्याच्या जवळ असलेली पिस्तोल त्यांच्यावर रोखली आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले. घटना घडल्यानंतर विरार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी श्रेय आणि विनीत पोहचले पण पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता घरी पाठवून दिले. या घडलेल्या घटनेची कहाणी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना लेखी तक्रार दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार बुधवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करून पिस्तूल रोखलेल्या आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांची विरार पोलिसांनी पाठराखण केल्याचा आरोपही श्रेय श्रीवास्तव यांनी केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस