शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये जुगार अड्ड्यावर रायगड पोलिसांची धाड, ४५ जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 00:54 IST

कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील विठ्ठलनगर येथील एका इमारतीच्या तळमजल्यावर बंद कार्यालयात अनधिकृत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

कर्जत - शहरामधील विठ्ठलनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रायगड पोलिसांनी धाड टाकली. रविवारी पहाटे छापा टाकून केलेल्या धडक कारवाईत ४५ जणांना जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आले. जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि वाहने असा ३८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक केलेल्या जुगारींमध्ये रायगडसह मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिकमधील लोकांचा समावेश आहे.कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील विठ्ठलनगर येथील एका इमारतीच्या तळमजल्यावर बंद कार्यालयात अनधिकृत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये वडखळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहायक फौजदार पिंगळे, महिला पोलीस हवालदार धूपकर, पोलीस नाईक म्हात्रे, तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार दिनेश पाटील, पोलीस शिपाई बेंद्रे, केंद्रे, वडखळ पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ३० आॅगस्ट पहाटे छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी या ठिकाणी ५ टेबलच्या भोवती खुर्च्यावर बसून काही व्यक्ती वेगवेगळे तीन पत्ती जुगारचे डाव खेळत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी त्या सर्व ४५ जणांवर कारवाई करून अटक केली. त्या ठिकाणी जुगार खेळण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह एकूण ७ लाख ६४ हजार ७८० रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. जुगार खेळणाऱ्यांनी आणलेली ९ वाहने असा एकूण ३८ लाख ६४ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल आहे.पकडण्यात आलेले जुगारी मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील असून, काही कर्जत तालुक्यातीलही आहेत. या घटनेचा पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत. सध्या गणेशोत्सव काळात जुगार अड्ड्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी यापूर्वीच पोलीस ठाण्यांना दिले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात अशा प्रकारे कोठेही बेकायदेशीरपणे जुगार खेळला जात असल्यास, त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास तात्काळ कळवावी, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले. अटक करण्यात आलेल्या ४५ जणांमध्ये ४३ पुरुष आणि दोन महिला यांचा समावेश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड