शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर डान्स बारवर छापेमारी; १७ जण ताब्यात तर १० जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 19:27 IST

नगर येथून डीवायएसपी अजीत पाटील यांचे मार्गदर्शना खाली सुपा पोलीसांनी कारवाई केली. 

ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू होते. दि. 21 रोजी पहाटे साडेचार वाजता गुन्हा दाखल झाला. आर्केस्ट्रा चालक व हॉटेल मॅनेजर ग्राहकांना प्रोत्साहित करताना मिळून आल्याने पोलिसांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पळवे ( जि. अहमदनगर) - नगर - पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटातील (ता. पारनेर) हॉटेलवर सुरू असलेल्या बेकायदा डान्सबारवर पोलिसांनी आदेश मिळताच मंगळवारी  रात्री  छापा टाकून  15 जणांना ताब्यात घेतले आहे. अचानक झालेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू होते. दि. 21 रोजी पहाटे साडेचार वाजता गुन्हा दाखल झाला. नगर येथून डीवायएसपी अजीत पाटील यांचे मार्गदर्शना खाली सुपा पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईबाबत पोलीस निरीक्षक  राजेंद्र भोसले म्हणाले,  आरोपींची खरी ओळख पटविण्यास विलंब लागत आहे. सात डान्स बारबाला त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडील 66 हजार जप्त करुन  उर्वरित दहा जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली. नगर-पुणे रस्त्यावरील सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जातेगाव घाटातील हॉटेल जयराज येथे बेकायदा डान्सबार सुरू होता. या घटनेची माहिती खबर्‍याने पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना दिली. त्यावरून सिंधू यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकून महिला व पुरुष अशा सुमारे दहा जणांना अटक केली. पोलीस आल्याचे समजताच काही जण पळून गेले. महाराष्ट्र हॉटेल उपग्रहे आणि मध्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबतचा कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे आहेत आरोपी संजय विठ्ठलराव जाधव (वय 48 राहणार गंगापूर)  प्रशांत अण्णासाहेब पाटील राहणार ( गंगापूर), अजित गुंडोपंत कदम (वय 44 राहणार लोहगाव ), कृष्णा सूर्याजी तोबरे (वय 24 राहणार लातूर), संदीप देविदास साबणे (वय 39 राहणार गंगापूर ), सय्यद नासिर सय्यद इस्माईल ( वय 40 राहणार गंगापूर), अमोल सुभाषराव वरकड (वय 41 राहणार गंगापूर), सारंगधर शंकरराव जाधव (वय 32 राहणार कासोडा तालुका गंगापूर), प्रदीप सत्यनारायण नवंदर ( वय 41 राहणार गंगापूर), वाल्मीक विठ्ठलराव शिरसाठ (राहणार गंगापूर), नितीन शेट्टी (हॉटेल चालक फरार), राजेंद्र सातव (हॉटेल मालक फरार) पोलीसांकडून समजलेली माहिती अशी जातेगांव शिवारातील हॉटेल जयराजचे पहिल्या  मजल्यावरील पार्टी हॉलमध्ये सात बारबाला आर्केस्ट्राच्या संगीताचे तालावर नाचगाणी करीत असताना,  नमूद ग्राहक नृत्यगणांच्या  अंगावर पैसे उधळून देत असताना,  त्यांच्याशी गैरवर्तन असभ्य वर्तन करताना, आर्केस्ट्रा चालक व हॉटेल मॅनेजर ग्राहकांना प्रोत्साहित करताना मिळून आल्याने पोलिसांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :raidधाडPoliceपोलिसAhmednagarअहमदनगरArrestअटकdanceनृत्य