शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 09:20 IST

पोलीस आल्याची सूचना देण्यासाठी आलार्म तर बारबालांना पळून जाण्यासाठी गुप्त खोलीतून पळवाट 

मीरा भाईंदर शहरात ऑर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास अश्लील डान्स चालत असताना केवळ खानापूर्ती म्हणून पोलिसांची कारवाई होत आहे. मीरारोडच्या मुंबई - अहमदाबाद महामार्गावर असलेल्या केम छो ह्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांच्या  धाडीत तब्बल १८ बारबाला सापडल्या असून, काहीजणी अश्लील डान्स करत होत्या. पोलीस आल्याची वर्दी देण्यासाठी अलार्म आणि बारबालांना लपण्यासाठी गुप्त खोली व तेथून पळण्यासाठी वाट केल्याचे उघडकीस आले आहे. 

मीरा भाईंदर शहरात ऑर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास अश्लील नाच व गैरप्रकार चालतात. बहुतांशी ऑर्केस्ट्रा बारची बांधकामे व अंतर्गत बदल हे बेकायदा आहेत, मात्र महापालिका ठोस कारवाई करत नाही. तर पोलिसांकडून देखील अश्या सातत्याने बारबालाना अश्लील नाचवणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा बार वर कठोर आणि प्रतिबंधात्मक कारवाई होत नाही. बहुतांश ठिकाणी तर, ऑर्केस्ट्रा बार व लॉज जोडून आहेत जेणे करून अनैतिक व्यवसाय चालवले जातात. हे आरोप नवीन नाहीत. 

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृह जवळ 'केम छो' हा ऑर्केस्ट्रा बार आहे. सदर बारमध्ये मोठ्या संख्येने बारबाला ह्या अश्लील नाच करत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास हंडोरे यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह छापा मारला असता आत २ बारबाला अश्लील हावभाव करत नाचत होत्या. तर, अन्य ५ बारबाला दिसल्या. 

मात्र, बातमीदाराने दिलेल्या माहिती नुसार आतमध्ये आणखी बारबाला मेकअप रूमच्या मागील पार्टीशन लगत खोलीत असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे गुप्त दरवाजा शोधला व चावीने दार उघडले असता, मागे अरुंद बोळ दिसून आला. त्या ठिकाणी ११ बारबाला सापडल्या. तेथून मागच्या बाजूने पळून जाण्यासाठी वाट केलेली होती. मात्र पोलिसांनी बाहेरून नाकाबंदी केल्याने ह्या बारबालांना पळून जाता आले नाही. तर बारच्या प्रवेशद्वार जवळ एक अलार्म बटन आढळून आले. पोलीस आले की ते वाजवून आतील बारबालांना पळून जाण्याची सूचना केली जात असे. 

काशीमीरा पोलीस ठाण्यात १८ बारबालांसह बारचा व्यवस्थापक चंद्रशेखर शेट्टी सह बार कर्मचारी मिळून एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बार मधून १ लाख १ हजार ७७० रोख , स्वाईप मशीन जप्त केली आहे. बारचा चालक, मालक, भागीदार ह्यांना पाहिजेत आरोपी म्हणून गुन्ह्यात दाखवले आहे. 

सदर बार हा पालिका व पोलिसांनी अनधिकृत म्हणून जमीनदोस्त केला होता. पालिकेने एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला होता. तरी देखील न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याचे पालिके कडून सांगण्यात येऊन सदर बारचे बांधकाम पुन्हा होऊन बार सुरु केला गेला. ऑर्केस्ट्रा बारच्या माध्यमातून दरमहा हप्त्यांचे सिंडिकेट चालत असल्याचे आरोप सह तक्रारी देखील झाल्या आहेत.

टॅग्स :raidधाडmira roadमीरा रोड