शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्लरवर धाड;  पोलीस उपायुक्तांच्या पथकाने १८ जणांना पकडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 20:26 IST

Raid on hookah parlor : या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून हुक्का पार्लर वर धाड टाकली .

मीरारोड - मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शितलनगर भागात बेधडक चालणाऱ्या शिशा लाऊंज ह्या हुक्का पार्लरवर परिमंडळ १ च्या उपायुक्तांच्या पथकाने धाड टाकून १८ जणांना पकडले आहे. या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मीरारोडच्या शीतल नगर मधील  रश्मीपार्क ए-२ हौसिंग सोसायटीच्या ९ ते १६ क्रमांकांच्या गाळ्यां मध्ये शिशा लाऊंज ह्या नावाने हुक्का पार्लर चालवले जात आहे . हर्बलच्या नावाखाली तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन चालत असल्याची माहिती मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ चे उपायुक्त अमित काळे यांना मिळाली.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून हुक्का पार्लर वर धाड टाकली . सदर धाडीत  हुक्का पार्लर मालक नोमान सय्यद (२६), व्यवस्थापक नरेश म्हात्रे  (४२), वेटर अनम उद्दीन (२४), इमरान मंडल (२५), अभिषेक पटेल (३२), फिरोज नसिरुद्दीन, इस्मानगनी भरभुय्या सह ग्राहक विजयसिंह राजपूत, अमित कोहली, सरफराज अली, उदीतकुमार गुप्ता, आनंद पांडेवय, धर्मेश मकवाना, नागिस जवेरी, मितेशकुमार सिंह, शहीद शेख, काजल अरुण वेरी, मुस्कान असिफअली वारसी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . त्यांच्यावर विविध कलमां खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  घटनास्थळावरून  २० हजार २१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

टॅग्स :raidधाडPoliceपोलिसArrestअटकcommissionerआयुक्तmira roadमीरा रोड