शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील हावभाव, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवणाऱ्या बारवर छापा, 56 जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 16:18 IST

Raid On Bar : याप्रकरणी केलेल्या कारवाईत बारचालक, मॅनेजर, वेटर महिला व ग्राहक अशा 56 जणांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानिक मानपाडा पोलिसांच्या हवाली केले.

ठळक मुद्देबारमधील 56 जणांना ताब्यात घेण्यात आले. यात 21 महिला वेटर, 30 ग्राहक, बारचालक आणि अन्य वेटर अशा 5 जणांचा समावेश आहे.

डोंबिवली: शिथिल केलेल्या निर्बंधात कोरोनाचे नियम पाळून व्यवसाय करण्यास मुभा दिली असताना मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोनालिसा रेस्टॉरंट आणि बारमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले गेले. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी टाकलेल्या धाडीत त्याठिकाणी महिला वेटर विनामास्क होत्या तसेच तोकडया कपडयात ग्राहकांशी अश्लील कृती व हावभाव करताना आढळून आल्या. याप्रकरणी केलेल्या कारवाईत बारचालक, मॅनेजर, वेटर महिला व ग्राहक अशा 56 जणांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानिक मानपाडा पोलिसांच्या हवाली केले.

हा बार कल्याण पुर्वेकडील हाजीमलंग रोडवर आहे. या ठिकाणी कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करून गाण्यांवर चाललेल्या महिलांच्या अश्लील हावभाव आणि कृत्याकडे स्थानिक मानपाडा पोलिसांचा कानाडोळा झाला असताना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक विलास पाटील यांना गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली की संबंधित बारच्या मालक आणि चालकांकडे परवाना नसतानाही त्याठिकाणी ग्राहकांना लेडीज सर्व्हिस  देवून ग्राहकांना आकर्षित करणेकरीता महिलांना तोकडे कपडे परिधान करण्यास लावून हावभाव करून अश्लीक कृत्य करीत आहेत.  मिळालेल्या माहीतीनुसार पाटील यांच्या पथकाने संबंधित बारवर छापा टाकला असता बातमीदाराने दिलेल्या माहीतीप्रमाणे त्याठिकाणी गैरकृत्य सुरू असल्याचे दिसून आले.

महिला वेटरांच्या तोंडावर मास्क ही नव्हते तर सोशन डिस्टन्सचा फज्जा देखील उडाला होता. बारमधील 56 जणांना ताब्यात घेण्यात आले. यात 21 महिला वेटर, 30 ग्राहक, बारचालक आणि अन्य वेटर अशा 5 जणांचा समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी 63 हजार 410 रूपयांची रोकड आणि 14 हजार 500 रूपयांचे गाणी वाजविण्याचे साहीत्य असा 77 हजार 910 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :raidधाडdombivaliडोंबिवलीPoliceपोलिस