शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतीची हत्या केली, रात्रभर मृतदेहाजवळ राहिली, सकाळी उठून ब्युटी पार्लर उघडल, असा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 19:54 IST

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पत्नीने पतीची हत्या करून रात्रभर मृतदेहाजवळ झोपल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पत्नीने पतीची हत्या करून रात्रभर मृतदेहाजवळ झोपल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. पत्नीने पतीला फोल्डिंग बारने मारहाण केल्याचा आरोप आहे. सकाळी उठल्यानंतर मुलं वडिलांना उठवायला गेली तेव्हा पत्नीने नकार देत वडिलांना उठवू नका असे सांगितले. त्यानंतर महिला तिच्या ब्युटी पार्लरमध्ये कामाला गेल्याचे समोर आले आहे.

महिला दिवसभर ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. संध्याकाळी परत आल्यावर महिलेने मुलांसाठी जेवण बनवले. मुलांना जेवण दिले आणि नंतर झोपवले आणि महिला स्वतः जागी राहिली. मध्यरात्री मुलं झोपली आणि परिसरात शांतता पसरली तेव्हा महिलेने एकट्याने पतीचा मृतदेह ओढून गेटवर फेकून दिला आणि झोपी गेली. सकाळी महिलेने स्वतःच असा गोंधळ घातला.पती दारू पिऊन आला आणि खाली पडला यात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

पाच जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या टोळींचा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सुरुवातीला या व्यक्तीचा मृत्यू अतिमद्यपानामुळे झाल्याचे पोलिसांनीही मान्य केले होते, मात्र नंतर तपास केला असता हत्येचे कारण दारू नसून गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाले, तेव्हा पोलिसही चक्रावले. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आणि संशयाच्या भोवऱ्यात पत्नीची चौकशी केली. हे संपूर्ण प्रकरण बछरावन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहगो पश्चिम गावातील आहे. येथे राहणाऱ्या अतुलला दारूचे व्यसन होते. पत्नी अन्नू ब्युटी पार्लर चालवायची आणि मुलांचा सांभाळ करायची.

पती स्वत: काहीच कमावत नव्हता आणि दारूवर पैसे खर्च करून महिलेने मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळून महिने पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतला आणि संधी शोधू लागली. 15 डिसेंबर रोजी पती दारू पिऊन रात्री उशिरा आला आणि अन्नूला मारहाण करू लागला. संधी साधून महिलेने त्यांच्या डोक्यावर फोल्डिंग स्लॅबने वार केले. तो बेशुद्ध पडल्यावर त्यांनी त्याचा गळा दाबून खून केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस