शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जॅमर काढ, अन्यथा तुझी नोकरीच घालवतो..हिंजवडीत वाहतुक पोलिसाशी अरेरावी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 17:53 IST

तुला बघून घेतो, नोकरीच घालवतो. असे धमकावणाऱ्या दोन जणांवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे अरेरावी करणाऱ्या या मोटारचालकाला कायदेशीर कारवाईमुळे तुरूंगाची हवा खाण्याची वेळ

पिंपरी : मोटारीला जॅमर लावलायं, पावती करणार नायं, काय होईल? फाशी होईल का कसले चलन? पहिल्यांदा तू जॅमर काढ, असा एकेरी उल्लेख करून वाहतुक पोलीसाशी अशी उद्धटपणे वाहनचालकाने वर्तणुक केली. एवढ्यावरच न थांबता, तुला बघून घेतो, नोकरीच घालवतो. असे धमकावणाऱ्या दोन जणांवर हिंजवडी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी वाहतुक विभागात कार्यरत असलेल्या अमोल जनार्दन बनसोडे (वय ३२)या पोलीस कर्मचाऱ्याने दोघांविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत पांडुरंग मालपोटे (वय ४५,रा.कातरखडक, मुळशी) आणि किरण छबन मालपोटे (वय ३०) या दोन आरोपींविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. गणपत मालपोटे या आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. शिवाजी चौक, हिंजवडी येथे पीएमपी बसथांब्याजवळ नो पार्कींग असा फलक लावलेला असताना, त्या ठिकाणी मोटारी उभ्या केलेल्या दिसुन आल्या. त्या मोटारींना वाहतुक पोलिसांनी जॅमर लावले. एमएच १४,ई एम ७०८० या क्रमांकाची मोटार तेथे उभी होती. त्या मोटारीलासुद्धा जॅमर लावले होते. मात्र या मोटारीचे जॅमर काढ, असे एकेरी भाषेत आरोपी वाहतूक पोलिसांना सांगत होते. पहिल्यांदा दंडाची पावती फाडा, नंतर जॅमर काढतो, असे सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याशी आरोपींनी हुज्जत घातली. जॅमर तुला काढावेच लागेल, असे शिवराळ भाषेत ते सांगू लागले. एवढेच नव्हे तर फियार्दी पोलिसाच्या अंगावर धावुन जाण्यापर्यंतची मजल त्यांनी मारली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी, वाकड परिसरात अशा प्रकारे वाहतुक पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. दोन दिवसांपुर्वी पुण्यातील एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत वाहतुक पोलिसांशी हुज्जत घालणारा, पोलीस कर्मचाऱ्याला तुला पगार किती? असे विचारतो आहे, अलिशान मोटार असल्याने शासकीय सेवेत असलेला वाहतुक नियमन करणारा पोलीस त्याला नगन्य वाटत असल्याचे सोशल मिडीयावर अनेकांनी पाहिले. अरेरावी करणाऱ्या या मोटारचालकाला कायदेशीर कारवाईमुळे तुरूंगाची हवा खाण्याची वेळ आली. ही घटना ताजी असताना, पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांच्या मानसिकतेबद्दल आश्चर्य व्यकत होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस