शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुसेवाला हत्याकांडात मानलेली बहिण अफसाना खान संशयाच्या भोवऱ्यात; NIA कडून ५ तास चौकशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 21:56 IST

पंजाब गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली-

पंजाब गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) प्रसिद्ध पंजाबी प्ले-बॅक सिंगर अफसाना खान हिला गँगस्टर-टेररिस्ट सिंडिकेट केसप्रकरणात समन्स धाडले. या प्रकरणात एनआयएनं मंगळवारी अफसाना खान हिची ५ तास चौकशी केली. अफसाना ही गायक मुसेवालाच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होती. ती मुसेवाला याला आपला भाऊ मानत होती. 

सुत्रांच्या माहितीनुसार अफसाना हिच्याकडून एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मुसेवाला केसमध्ये सहभागी असलेल्या गँगस्टर कनेक्शनबाबत माहिती मिळवली आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडात अफसाना खान हिचाही सहभाग असल्याचा एनआयएला संशय आहे. नुकतंच गँगस्टर्सवर एनआयएनं टाकलेल्या दुसऱ्या धाडीत अफसाना खान हिचं नाव तपास संस्थेच्या रडारवर आलं होतं. 

बंबीहा गँग आणि लॉरेन्स बिश्नोई गँगचं शत्रुत्व आहे. बिश्नोई गँगवर सिंगर सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा आरोप आहे. एनआयएनं या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्याच्या हेतूनं दोनवेळा छापेमारी देखील केली होती. 

मुसेवालाची झाली होती हत्यासिद्धू मुसेवाला याच्यावर २९ मे रोजी गोळीबार करुन त्याची हत्या करण्यात आली होती. अवघ्या २८ वर्षीय मुसेवालानं जगाचा निरोप घेतला आणि या हत्याकांडाची संपूर्ण देशभर चर्चा झाली. हल्लेखोरांनी एके-४७, एके-९४ सह इतर घातक शस्त्रांसह मुसेवाला याच्यावर ३० राऊंड फायर केले होते. या हत्याकांडाची जबाबदारी गँग लीडर लॉरेन्स बिश्नोईचे जवळचा सहकारी गँगस्टर गोल्डी ब्रार याने घेतली होती. गोल्डी ब्रार कॅनडामधून भारतात अशा हिंसक कारवाया हाताळतो. 

सिद्धू मुसेवाला आपल्या करिअरच्या अगदी शिखरावर होता. त्याची तगडी फॅनफॉलोइंग होती. एका यशस्वी गायकावर अवघ्या वयाच्या २८ व्या वर्षी दिवसाढवळ्या गोळीबार होऊ शकतो असा कुणीच विचार केला नव्हता. मूसेवाला हत्याकांडाला आता बरेच महिने उलटून गेले असले तरी त्याला अद्याप न्याय मिळालेला नाही. आरोपींना तातडीनं पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मुसेवाला कुटुंबीय आणि त्याचे चाहते करत आहेत. 

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाCrime Newsगुन्हेगारी