शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Punjab Shiv Sena leader Murder: पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची टार्गेट किलिंग, 5 गोळ्या झाडल्या; 'या' संघटनेने घेतली जबाबदारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 18:59 IST

मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंदिराबाहेर आंदोलन करणाऱ्या शिवसेना नेत्यावर भररस्त्यात गोळ्या झाडल्या.

Sudhir Suri killing in Amritsar: पाकिस्तानच्या इशाऱ्यावर सुरू असलेल्या काश्मीरमधील टार्गेट किलिंगच्या घटना शांत झालेल्या नाहीत, यातच पंजाबमध्येही अशा घटना घडत आहेत. अमृतसरमध्ये मूर्तींची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंदिराबाहेर आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या सुधीर सुरी यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सुरीच्या सुरक्षा रक्षकांनीही हवेत गोळीबार केला, मात्र हल्लेखोरांनी संधीचा फायदा घेत तेथून पळ काढला. एका आरोपीला परवानाधारक शस्त्रासह पकडण्यात आले असून, पोलीस या घटनेचा अनेक अँगलने तपास करत आहेत.

जमावासमोर गोळ्या झाडल्यापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते सुधीर सुरी शुक्रवारी संध्याकाळी अमृतसरमधील मजिठा रोडवरील गोपाल मंदिराजवळ मूर्तींच्या विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन करत होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्या. सुरीच्या सुरक्षा रक्षकांनीही बचावासाठी हवेत गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार होताच घटनास्थळी गोंधळ उडाला, त्याचा फायदा घेत हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. शिवसेना नेत्याला गंभीर अवस्थेत फोर्टिस एस्कॉर्ट्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला.

समर्थकांनी वाहनांची तोडफोड केलीसुधीर सुरी यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचे समर्थक संतप्त झाले. मंदिराभोवती उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड करून पोलिस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना समज देऊन शांत केले. पोलिसांनी समर्थकांना कारवाईचे आश्वासन देत शांतता राखण्याचे आवाहन केले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या भागात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांना सुगावा लागला.

एक आरोपी पकडला, शस्त्रेही जप्तपोलिस आयुक्त अरुण पाल सिंह यांनी सांगितले की, हल्ल्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संदीप सिंग असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून घटनेत वापरलेले परवाना शस्त्र जप्त करण्यात आले आहे. एक हल्लेखोर अद्याप फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर 'जस्टिस लीग इंडिया' नावाच्या अज्ञात संघटनेने या हत्याकांडाची जबाबदारी घेतली आहे. पंजाबमधील आरएसएस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना संपवणे सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

सुधीर सुरी दहशतवाद्यांच्या निशाण्यावरमिळालेल्या माहितीनुसार, सुधीर सुरी हे व्यवसायाने ट्रान्सपोर्टर होते. पंजाबमधील खलिस्तानी दहशतवाद आणि देशविरोधी कारवायांविरुद्ध ते आवाज उठवत होते. बर्‍याच दिवसांपासून सुरी खलिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते, त्यामुळे सरकारने त्यांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांचे 8 कर्मचारी ठेवले होते. पण ते जवानही त्यांना वाचवू शकले नाहीत. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना