शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गॅंगस्टर दीपक टीनूच्या गर्लफ्रेन्डला अटक, मालदीवला पळून जाणार इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 10:52 IST

Crime News : पंजाब पोलिसांनी दावा केला आहे की, पकडण्यात आलेल्या तरूणीनेच गॅंगस्टर टीनूला पळून जाण्यास मदत केली होती.

Crime News : लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य  गॅंगस्टर दीपर कुमार उर्फ टीनू पोलिसांच्या तावडीतून फरार झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आता पंजाब पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी टीनूच्या गर्लफ्रेन्डला मुंबई एअरपोर्टवरून अटक केली आहे. ती मुंबईहून मालदीवला पळून जात असताना तिला अटक केली गेली. 

पंजाब पोलिसांनी दावा केला आहे की, पकडण्यात आलेल्या तरूणीनेच गॅंगस्टर टीनूला पळून जाण्यास मदत केली होती. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. पण तो भारतात आहे की, परदेशात हे पोलिसांनी सांगितलं नाही.

दरम्यान 1 ऑक्टोबरला गॅंगस्टर दीपक कुमार उर्फ टीनू चौथ्यांदा पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. टीनू हा लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य आहे. सिद्धू मूसेवाला हत्येबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस त्याला रिमांडवर घेऊन जात होते. मूसेवालाच्या हत्येच्या प्लानिंगचा शेवटचा कॉन्फरन्स कॉल लॉरेन्स आणि टीनू यांच्यात 27 मे रोजी झाला होता. 29 मे रोजी सिद्धू मूसेवालाची हत्या करण्यात आली होती.

गॅंगस्टर टीनूवर 34 पेक्षा जास्त केसेस आहेत. त्याच्यावर पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि दिल्लीसहीत वेगवेगळ्या राज्यात 34 34 पेक्षा जास्त केसेस आहेत. यात हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीर हत्यार जवळ ठेवणे आणि खंडनी अशा केसेस आहेत. ही खरंच आश्चर्याची बाब आहे की, टीनू 4 वेळा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPunjabपंजाब