शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती भांडणामुळे पत्नी माहेरी गेली; संतापलेल्या पतीने पत्नी-मुलांसह पाच जणांना जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 15:41 IST

संतापलेल्या पतीने पत्नी आणि दोन मुलांसह सासू-सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली.

Punjab Crime News: पंजाबच्या जालंधरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नी घरी येत नसल्यामुळे नाराज पतीने सासरी जाऊन पत्नी, मुलगा, मुलगी, सासरे आणि सासूला जिवंत जाळले. मेहतपूर शहरात ही घटना घडली असून, कुलदीप सिंग, असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत पत्नी परमजीत कौर, मुलगा गुरमोहल, मुलगी अर्शदीप कौर, सासू जंगीद्रो आणि सासरे सुरजन सिंग यांचा होरपळून मृत्यू झाला.

एसपी सरबजीत सिंग बहिया यांनी सांगितले की, आरोपी कुलदीप सिंगने त्याच्या साथीदारांसह सासरी जाऊन सर्वांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले आणि घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. कुलदीप आणि परमजीतचे दुसरे लग्न झाले होते आणि परमजीत त्याच्यासोबत राहत नव्हती. पत्नी घरी येत नसल्यामुळे आरोपी कुलदीप नाराज होता.

काय आहे संपूर्ण प्रकरणसुरजन सिंगने 8 वर्षांपूर्वी मुलगी परमजीत कौरचे लग्न लावले होते, पण काही काळापूर्वीच पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर परमजीत कौर आपल्या दोन मुलांसह माहेरी आल्या. सुमारे वर्षभरापूर्वी परमजीत यांचे दुसरे लग्न खुरासैदपूर गावातील कुलदीप सिंग उर्फ ​​कल्लू नावाच्या व्यक्तीशी लावले. पण, कल्लूने पत्नी आणि मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर परमजीत आपल्या माहेरी निघून आल्या. 

आरोपी फरारघटनेच्या दिवशी म्हणजेच काल रात्री कुलदीप दारू पिऊन सासरी आला. तेव्हा परमजीतचे संपूर्ण कुटुंब झोपले होते. यावेळी कुलदीपने पेट्रोल शिंपडून घराला आग लावली. यात सासरा सुरजन सिंग, सासू जांगीद्रो, पत्नी परमजीत, मुलगा गुरमोहल आणि मुलगी अर्शदीप यांचा होरपळून मृत्यू झाला. सध्या पोलीस कुलदीप सिंगचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीfireआग