शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील तरुणाचा गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये खून: मोबाइलमध्ये होते प्रेयसीचे न्यूड फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 16:45 IST

पंचतारांकित हॉटेलमध्ये एक व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

गुवाहाटी : लव्ह ट्रँगलमधून गुवाहाटीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. तरुणीने आपल्या नव्या प्रियकराच्या मदतीने ४२ वर्षीय जुन्या प्रियकराचा खून केला आहे. संदीप सुरेश कांबळी असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते मूळचे पुण्यातील रहिवासी होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी विमानतळाच्या जवळच असणाऱ्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी संदीप कांबळी यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणातील आरोपी अंजली शॉ आणि तिचा नवा प्रियकर राकेश शॉ हे दोघे कोलकात्याला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी ताबोडतोब तपासाची चक्रं फिरवली आणि आरोपींना बेड्या ठोकल्या.

अंजली ही २५ वर्षीय तरुणी संदीप कांबळी यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. मात्र मागील वर्षी दोघांमध्ये वाद झाला आणि अंजलीने संदीपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अंजली ही राकेश शॉ या तरुणाच्या प्रेमात पडली. त्यानंतर राकेश याने अंजलीकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र संदीप कांबळी याच्याकडे अंजलीचे काही न्यूड फोटो होते. त्यामुळे अंजलीने संदीप कांबळी याला भेटायचं ठरवलं. ही भेट आधी कोलकाता विमानतळावर ठरली होती. मात्र संदीपने भेटीचं ठिकाण बदलून गुवाहाटी केलं. त्यानंतर संदीपची भेट घेण्यासाठी अंजली ही कोलकात्यातून आपला प्रियकर राकेश याच्यासोबत गुवाहाटीला गेली. संदीपने तेथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अंजली आणि त्याच्यासाठी एक रूम बुक केली होती. राकेशनेही संदीपला न कळवता त्याच हॉटेलमध्ये स्वत:साठी एक रूम बुक केली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे अंजली ही संदीपच्या भेटीसाठी गेली. मात्र तिने तिथे एकटीने न जाता राकेशलाही सोबत घेतलं.

भेटीसाठी अंजली ही एकटी न येता तिच्यासोबत तिचा नवा प्रियकर राकेश हा देखील आल्याचं पाहून संदीपचा पारा चढला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं. याच हाणामारीत संदीप गंभीर जखमी झाला आणि त्याने जागीच प्राण सोडले.

दरम्यान, पंचतारांकित हॉटेलमध्ये एक व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि हॉटेलमधील कामगारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासास सुरुवात केली आणि काही तासांतच आरोपी अंजली आणि राकेश यांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून दोन्ही आरोपींची चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :guwahati-pcगौहतीCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे