शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे हादरले ! आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत मुलीसोबत गैरकृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 08:53 IST

चौदा वर्षांच्या मुलीवर नऊ जणांचा दोन दिवस अमानुष अत्याचार

ठळक मुद्देआठ अटकेत; पाच रिक्षाचालक, दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेशमुलीच्या वडिलांनी दिलेल्या  तक्रारीनुसार तपास करत असताना पोलिसांनी पीडितेला चंदीगढहून ताब्यात घेतले. त्यानंतर हा भयावह प्रकार उघडकीस आला

 

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात १४ वर्षांच्या मुलीवर नऊ जणांनी अमानुषपणे सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली व पुण्यासह संपूर्ण राज्यातील समाजमन हादरून गेले. पीडित मुलगी बिहारला जाण्यासाठी रात्री पुणे रेल्वे स्टेशनवर आली होती. मात्र ट्रेन नसल्याने स्टेशनवरच फिरत असतानाच रिक्षाचालक नराधमाची नजर तिच्यावर पडली. घरी सोडण्याच्या बहाण्याने त्याने तिचे अपहरण केले. त्यानंतर मित्रांच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या  तक्रारीनुसार तपास करत असताना पोलिसांनी पीडितेला चंदीगढहून ताब्यात घेतले. त्यानंतर हा भयावह प्रकार उघडकीस आला. पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि खडकी परिसरातील लॉज व इतर ठिकाणी नेऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला. वानवडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. त्यात रेल्वेचे दोन कर्मचारी, पाच रिक्षाचालक आणि अन्य आरोपींचा सहभाग आहे. तब्बल दोन दिवस हे नराधम मुलीवर अत्याचार करत होते. पहिल्या दिवशी चौघांनी, तर दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलगी मूळची बिहार येथील आहे. तिचे वडील वानवडीत एका ठिकाणी माळीकाम करतात. ती तिच्या आईवडिलांसोबत राहते. ३१ ऑगस्टला मुलगी तिच्या बिहार येथील मित्राला भेटायला निघाली होती. घरच्यांना माहिती न देताच ती पुणे स्टेशन परिसरात आली होती. मात्र, तो मित्र आलाच नाही. रात्री कोणतीही रेल्वे नव्हती. रात्री उशिरापर्यंत ती स्टेशन परिसरात फिरत होती. आरोपींची नजर तिच्यावर पडली. त्यांनी तिला रात्री राहण्याची सोय करतो, उद्या रेल्वेत बसवून देतो, असे सांगून डाव साधला.

आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत गैरकृत्यnनराधम रिक्षाचालकावर विश्वास ठेवून पीडित मुलगी त्याच्याबरोबर गेली. रिक्षाचालकाने वाटेत आणखी एका रिक्षाचालकाला बरोबर घेतले. तेथून तिला एका लॉजला नेले. तेथे तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन रिक्षाचालकांनी अत्याचार केला. nदरम्यान, हा प्रकार कोणाला सांगितला तर, आईवडिलांना मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या लोकांच्या ताब्यात तिला दिले. दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर मुलगी रेल्वेने मुंबई आणि तेथून चंढीगडकडे गेली होती.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी