शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील तरुणी मृत्यू प्रकरण; अनावश्यक प्रसिद्धी देऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 06:45 IST

प्रसारमाध्यमांना उच्च न्यायालयाचे निर्देश. तरुणीच्या आत्महत्येबाबत व तिच्या प्रेमसंबंधांबाबत प्रसारमाध्यमांत वृत्त येत असल्याने तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुण्यातील तरुणीचे बहुचर्चित आत्महत्या प्रकरण व तिच्या कथित अनैतिक संबंधांना अनावश्यक प्रसिद्धी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रसारमाध्यमांना दिले.

तरुणीच्या आत्महत्येबाबत व तिच्या प्रेमसंबंधांबाबत प्रसारमाध्यमांत वृत्त येत असल्याने तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती. तरुणीच्या वडिलांच्या वतीने ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.पुण्याच्या घरातील बाल्कनीत उभी असलेली तरुणी पाय घसरून खाली पडली. यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लगेच  प्रसारमाध्यमांनी २३ वर्षीय तरुणीचे एका राजकीय व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. हे वृत्त बदनामीकारक आहे. तसेच तरुणीचे अज्ञात व्यक्तीबरोबर झालेले संभाषण राजकीय व्यक्तींनी व प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले, अशी माहिती गुप्ते यांनी उच्च न्यायालयाला दिली.

गुप्ते यांनी दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांनी कसे वार्तांकन करावे, याबाबत आखलेली मार्गदर्शक तत्त्वे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. सकृतदर्शनी याचिकाकर्त्यांच्या आरोपात तथ्य आहे, असे म्हणत न्यायालयाने सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश प्रसारमाध्यमांना दिले.

४ वृत्तवाहिन्यांना नोटीस याचिकाकर्त्यांच्या मुलीच्या मृत्यूसंबंधी व तिच्या कथित प्रेमसंबंधाला अनावश्यक प्रसिद्धी देऊ नये, असे म्हणत सुनावणी ३१ मार्च रोजी ठेवली. न्यायालयाने या प्रकरणी केंद्र व राज्य सरकार, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन व चार मराठी वृत्तवाहिन्यांना नोटीस बजावली आहे.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडHigh Courtउच्च न्यायालय