शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव मूळ पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर सशस्त्र हल्ला; कुटुंबीयांना मारहाण, महिलेशी गैरवर्तन; घरातून १ लाखांची रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 20:02 IST

Pune ZP, Panchayat Samiti Election news: फिर्यादी सुरज चौधरी हे पंचायत समिती हवेली सदस्य पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उमेदवार होते, त्यामुळे हा हल्ला निवडणूक वादातून झाला का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कउरुळी कांचन (ता. हवेली): हवेली पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या सुरज भालचंद्र चौधरी यांच्या घरावर सशस्त्र जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी  (दि. ८) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पेठ चारवाडावस्ती येथे घडली. या हल्ल्यात कुटुंबीयांना गंभीर मारहाण करण्यात आली असून महिलेशी गैरवर्तन, घराची तोडफोड व १ लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 36/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 118(1), 333, 189(2), 191(2), 190, 115(2), 352, 351(2), 351(4) अंतर्गत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुरज चौधरी यांनी  पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते घरात असताना गावातील विजय रामचंद्र चौधरी व त्यांचा मुलगा ओम चौधरी हे चाकू व लोखंडी रॉडसह घरात घुसले. यावेळी वडील भालचंद्र चौधरी व भाऊ अक्षय यांना मारहाण करण्यात आली. अक्षय यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आला. मारहाण थांबविण्यासाठी मध्ये पडलेल्या आई शोभा चौधरी यांचे केस ओढून त्यांचा ब्लाऊज फाडण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.

यानंतर तानाजी विलास चौधरी, हर्षद राजेश चौधरी व विशाल दीपक चौधरी हेही घरात घुसले. सर्व आरोपींनी मिळून सुरज चौधरी, त्यांचे वडील व भाऊ संदेश यांना लोखंडी रॉड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हल्ल्यानंतर आरोपींनी घरातील साहित्याची तोडफोड करून पलायन केले. घटनेनंतर घराची पाहणी केली असता कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली १ लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले. जखमींवर वैद्यकीय उपचार करून घेण्यात आले असून त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.

विशेष म्हणजे, फिर्यादी सुरज चौधरी हे पंचायत समिती हवेली सदस्य पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उमेदवार होते, त्यामुळे हा हल्ला निवडणूक वादातून झाला का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. प्रकरणाचा तपास सहा. फौज सस्ते करीत असून, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. आरोपींच्या अटकेबाबत पोलीस तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Attack on Panchayat Committee Candidate's House; Family Assaulted, Cash Stolen

Web Summary : Armed men attacked a Panchayat Committee candidate's house, assaulting his family and stealing ₹1 lakh. A woman was molested during the attack, which is suspected to be election-related. Police have registered a case and are investigating.
टॅग्स :PuneपुणेZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६panchayat samitiपंचायत समिती