शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Pune Accident: दुचाकीवर झाड पडून नव विवाहित जोडप्याचा मृत्यू; भाची गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 23:52 IST

एक सात वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले  आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड वीर रस्त्यावर आज सायंकाळी रस्त्याच्या कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील नव विवाहित जोडप्याचा मृत्यू  झाला. तर एक सात वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले  आहे.

    याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, आज  दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी  पाउस व वादळ वारा  सुरु झाला. यावेळी मयत  रेनुकेश गुणशेखर जाधव  वय २९ वर्ष  व त्याची पत्नी सारिका रेनुकेश जाधव वय  २३ वर्ष त्याच बरोबर त्याची भाची ईश्वरी संदेश देशमुख हे सासवडहून परिंचेकडे मोटार सायकलवर जात होते. साधारण सात वाजलेच्या सुमारास पिंपळे येथून जात असतांना रस्त्या शेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची भाची (बहिणीची मुलगी)  गंभीर जखमी झाली. घटने नंतर परिसरातील नागरीक  मदतीला धावले.

पोलिसानी  तातडीने घटना स्थळी धाव घेऊन अपघात ग्रास्थांना  सासवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र तो पर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. तर मुलगी  बेशुध्द अवस्थेत असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. रेनुकेश जाधव हा पिरींचे येथील पत्रकार गुणशेखर जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता तर रेनुकेश आणि  सारिका यांचा चार महिन्या पूर्वीच विवाह झाला आहे .या घटने मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

टॅग्स :AccidentअपघातRainपाऊस