शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

उपायुक्ताकडे सापडली १ कोटी २८ लाखांची बेनामी संपत्ती; पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Updated: July 13, 2023 20:39 IST

याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य व तत्कालीन उपायुक्तावर उत्पन्नापेक्षा १ कोटी २८ लाख ९५ हजार १५० रुपयांहून अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. नितीन चंद्रकांत ढगे (वय ४१) आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा नितीन ढगे (वय ३५, रा. रहेजा गार्डन्स, वानवडी) यांच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन ढगे हा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा सदस्य असताना तक्रारदारच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यात तडजोड करुन २ लाख रुपये घेऊन वानवडीच्या घरी तक्रारदाराला बोलावले होते. १६ ऑक्टोबर २०२१ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना ढगे याला पकडले होते. या वेळी घेतलेल्या घरझडतीमध्ये १ कोटी २८ लाख ४९ हजार रुपयांची रोकड सापडली होती. तसेच जवळपास पावणे तीन कोटींची मालमत्ता आढळून आली होती.नितीन ढगे याच्या मालमत्तेची २०२१ पासून उघड चौकशी सुरु होती. उघड चौकशीमध्ये ढगे हे १ कोटी २८ लाख ९५ हजार १५० रुपयांचा खुलासा करु शकले नाहीत. त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा ही मालमत्ता ४७ टक्के अधिक आहे. त्यामुळे त्यांनी ही अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे निष्पन्न झाले. नितीन ढगे यांची पत्नी प्रतिभा ढगे यांनी अपप्रेरणा दिल्याने तसेच खोटी माहिती कागदपत्रांमध्ये भरुन वापरुन शासनाची फसवणूक केली. त्यामुळे नितीन ढगे व प्रतिभा ढगे यांच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणPuneपुणेPoliceपोलिस