शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

पंपचालकानेच घातला इंधनमाफियाला गंडा, १२ हजार लिटरऐवजी दिले ३ हजार लिटर डिझेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 00:45 IST

लोणी काळभोर येथील एका इंधनमाफियाने बाणेर (पुणे) परिसरातील एका पंपचालकाला बारा हजार लिटरऐवजी फक्त तीन हजार लिटर डिझेल देण्याचा प्रयत्न केला. मात्र...

लोणी काळभोर  - येथील एका इंधनमाफियाने बाणेर (पुणे) परिसरातील एका पंपचालकाला बारा हजार लिटरऐवजी फक्त तीन हजार लिटर डिझेल देण्याचा प्रयत्न केला. जवळपास ९ हजार लिटर डिझेलचा काटा मारत असल्याची बाब वेळीच पंपचालकाच्या लक्षात आल्याने त्याने माफियाला कोंडीत पकडून तीन हजार लिटर मोफत पदरात पाडून घेतल्याची घटना घटना मागील आठवड्यात घडली.आपण वाहन घेऊन पेट्रोल पंपावर पेट्रोल अथवा डिझेल भरताना ते कमी भरले जाते, अशी तक्रार आपण नेहमीच ऐकतो किंवा करतो. परंतु, इंधनमाफियालाच पंपचालकाने गंडा घातल्याची घटना प्रथमच उघडकीस आली असल्याने ही बाब या या परिसरात चर्चेची ठरली आहे. येथील एका तेलमाफियाच्या नावे येथील एका तेल कंपनीमध्ये डिझेल व पेट्रोल वाहतूक करण्याचा ठेका आहे. लोणी काळभोर परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर त्याच्या जवळच्या नातेवाइकाच्या नावावरही पेट्रोल पंप आहे.बाणेर परिसरातील सरकारी कंपनीच्या पेट्रोल पंपावर खाली करण्यासाठी संबंधित कंपनीच्या डेपोमधून मागील आठवड्यात १२ हजार लिटर डिझेल भरून टँकर बाहेर पडला होता. बाहेर पडताच या इंधनमाफियाने टँकर स्वत:च्या पंपावर नेऊन त्यातील ६ हजार लिटर डिझेल पंपात उतरवून घेतले व चालकाला टँकर बाणेर येथील एका पंपावर खाली करण्यासाठी घेऊन जाण्यास सांगितले. टँकर चालकाने पुढे गेल्यानंतर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एका इमारतीजवळ टँकर उभा करून त्यातील ३ हजार लिटर डिझेल काढून एकाला त्याची विक्री केली. हा टँकर बाणेर येथे पोहोचल्यानंतर टँकरमध्ये असलेल्या तीन कप्प्यात डीप टाकून न मोजता त्या टँकरमधील डिझेल पंपावर असलेल्या साठवण टाकीत खाली करण्यास संबंधित पंपाच्या व्यवस्थापकाने परवानगी दिली.काही वेळातच टँकरमधील बारा हजार लिटर डिझेल खाली झाल्याचे व्यवस्थापकाला समजताच त्याला डिझेल कमी असल्याचा संशय आला. पुष्टी करण्यासाठी व्यवस्थापकाने पंपाच्या डिझेल साठवणुकीच्या टाकीत डीप टाकून तपासणी केली असता टँकरमधून बारा हजार लिटरऐवजी फक्त तीनच हजार लिटर डिझेल खाली झाल्याचे उघडकीस आले. सरकारी कंपनीच्या पंप व्यवस्थापकाने ही बाब तत्काळ संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. अधिकाऱ्यांनी संबंधित माफियाला बोलावून घडलेल्या घटनेची माहिती दिली. तसेच, हे प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवण्याची विनंतीही केली. यावर संबंधित माफियाने टँकर आपल्याच पंपात खाली झाल्याचे दाखविल्यास ही चोरी पचू शकते हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. कंपनीच्या अधिका-याने वेळ न दवडता बाणेर परिसरातील संबंधित पंपाच्या नावाचे चलन बदलून माफियाच्या पंपाच्या नावाने दिले.तसेच, बाणेर येथील पंपाच्या व्यवस्थापकाला फोन करून प्रकरण न वाढवण्याची विनंती केली. पंप व्यवस्थापकालाही फुकटचे ३ हजार लिटर डिझेल मिळाल्याने हे प्रकरण दडपले गेले. तेल कंपनीच्या अधिका-यांनी या चोरीतील आपला व संबंधित तेल माफियाचा सहभाग लपविण्यासाठी टँकर चालकाला पंपावर देण्यासाठी कंपनीकडून देण्यात आलेले चलन बदलून दिल्याचे निष्पन्न झाले आहे.या प्रकरणामुळे लोणी काळभोर येथील हिंदूस्थान पेट्रोलियम, इंंडियन आॅइल व भारत पेट्रोलियम या तीनही तेल कंपन्यांच्या टर्मिनलमधून बाहेर पडणा-या टँकरमधील पेट्रोल-डिझेलवर मास्टर की वापरून डल्ला मारणारे स्थानिक इंधन माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. यावरून या इंधनमाफियांची पाळेमुळे खोलवर रूजली असून त्यांना टर्मिनलचे अधिकारीही साथ देतात, ही बाब लक्षात येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे