शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

Crime News : 50 लाखांची मदत अन् सरकारी नोकरी द्या, पीडित पुजाऱ्याच्या कुटुंबीयांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 10:31 IST

राज्याच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत एका आरोपीस अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी घडली.

जयपूर - राजस्थानमधील करौली परिसरात जमिनीच्या वादावरुन मंदिराच्या पुजाऱ्याची जाळून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. राजस्थानातील करौली येथील बुकना या गावी मंदिराच्या जमिनीवरून दोन गटामध्ये झालेल्या वादात पुजाऱ्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आलं. जळालेल्या गंभीर अवस्थेत पुजाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, पीडित कुटुंबीयांन अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. याप्रकरणी पीडित कुटुबीयांनी आरोपींना पोलिसांनी पाठिशी घातल्याचा आरोप केला आहे. तसेच, आम्हाला 50 लाख रुपये आर्थिक मदत आणि एकास सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे.  

राज्याच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत एका आरोपीस अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी घडली. मंदिराच्या जागा बळकावण्यासाठी कैलास मीणा, शंकर, नमो, रामलखन मीणा आदी छप्पर टाकत होते. यादरम्यान वयस्कर पुजारी बाबूलाल यांनी ते सुरु असलेले काम थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी आरोपींनी त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. त्यामध्ये पुजारी होरपळून गेले होते. मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण रोखल्यामुळेच त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

याप्रकरणी पुजाऱ्याच्या पीडित कुटुंबीयांनी काही पोलिसांवर आरोप केले आहेत. आरोपींना पाठिशी घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करत आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणीही पीडित कुटुंबीयांनी केली आहे. आम्हाला बाबुलाल यांच्या अंत्यसंस्कारातही सामिल होता आले नाही, त्यांचे अंत्यदर्शनही घेता आले नसल्याची खंत नातेवाईकांनी बोलून दाखवली. तसेच, आम्हाल 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, व कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे.  

काय आहे संपूर्ण प्रकरण?

करौलीच्या बुकना गावात पुजार्‍याला जिवे मारण्यात आले. बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात पुजाऱ्याच्या वेदनादायक मृत्यूमुळे राजधानी जयपूरसह करौली जिल्ह्यातील पुजारी आणि ब्राह्मण समाज या घटनेचा तीव्र विरोध करत आहे.

ब्राह्मण समाज, पुजारी संघ, ब्राह्मण समाज, बजरंग दल, भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करून आरोपींना अटक केली आहे आणि त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यासह पीडितेच्या कुटूंबाला 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरीची मागणी करण्यात आली आहे. आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. इथल्या घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक मृदुल कच्छवा यांनी विशेष पथके तयार केली आणि या घटनेतील मुख्य आरोपी कैलाश मीनाला अटक केली, तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनRajasthanराजस्थान