शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आरटीआयअंतर्गत अर्जदारांना सर्व आवश्यक माहिती द्या; पोलीस महासंचालकांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 21:29 IST

माहिती आयुक्तांच्या आदेशानुसार कार्यवाही

ठळक मुद्देतपासाधिन व गोपनीय प्रकरणासंबंधी गुणवत्तेनुसार निर्णय घेवून माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.अंधेरी येथील फरीदा कुरेशी यांनी माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५ अतर्गंत विचारण्यात आलेली माहिती नाकारली होती.

जमीर काझीमुंबई - पोलीस ठाणे, विविध शाखाकडे माहिती अधिकार अधिनियम कायद्यातर्गंत मागण्यात आलेल्या अर्जाला उत्तर न देणे, आता पोलीस अधिकाऱ्यांना महागात पडणार आहे. कारण विषयाच्या अनुषंगाने सर्व आवश्यक माहिती निर्धारित कालावधीत पुरविण्याचे आदेश पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना दिले आहेत. राज्य माहिती आयुक्तांनी एका प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार महासंचालकांनी त्यासंबंधी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर तपासाधिन व गोपनीय प्रकरणासंबंधी गुणवत्तेनुसार निर्णय घेवून माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.

अंधेरी येथील फरीदा कुरेशी यांनी माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५ अतर्गंत विचारण्यात आलेली माहिती नाकारली होती. प्रथम अपिलही नाकारल्याने त्याविरुद्ध त्यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे द्वितीय अपील केले होते. त्याबाबत यावर्षी १२ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीवेळी आयुक्तांनी पोलिसांना त्यासंबंधी माहिती देण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे आरटीआय अर्जावर तपासाधिन, न्यायप्रविष्ठ बाबी असल्याचे सांगूून माहिती टाळण्याच्याा प्रकारावर कडक ताशेरे ओढले. त्यासंबंधी गृह विभागाला आदेश देत पोलिसांना योग्य सूचना द्यावी, माहिती टाळणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गृह विभागाकडून आलेल्या पत्रानुसार पोलीस महासंचालक जायसवाल यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना सूचना केल्या आहेत. ‘आरटीआय’अंतर्गत माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अर्जदारांनी मागितलेली सर्व माहिती, अहवाल, सीसीटीव्ही फुटेज पुरवावयाची आहे. मात्र,एखादी बाब तपासाधिन, न्यायप्रविष्ठ असल्यास आणि त्याबाबत माहिती दिल्यास तपास, न्यायालयीन प्रकरणात अडथळा येत असल्यास ती पुरविण्यात येवू नये, अशा सूचना पोलीस आयुक्त, सर्व जिल्हा अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.आरटीआय अर्जासंबंधी पोलिसांना सूचनाअर्जदाराने मागणी केलेली माहिती तपासाधीन, न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण देवून नाकरण्यात येवू नये, एखाद्या प्रकरणात तशा प्रश्न निर्माण झाल्यास गुणवत्तेवर निर्णय घेवून माहिती पुरविण्यात यावी, असे निर्देश महासंचालकांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.सीसीटीव्ही फुटेजही पुरवाअनेकवेळा अर्जदारांकडून गुन्ह्याचा तपास, त्यासंबंधी कागदपत्रे, अहवालाबरोबरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची मागणी केली जाते. त्यासाठी पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेज जतन करुन ठेवण्यात यावेत, प्रकरणाची आवश्यकता व गुणवत्तेनुसार त्यासंबंधी जनमाहिती अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात यावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताPoliceपोलिसMumbaiमुंबईcommissionerआयुक्त