उल्हासनगरात चोरीला गेलेला २३ लाखाचा मुद्देमाल परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 22:08 IST2022-02-11T22:08:54+5:302022-02-11T22:08:58+5:30
सदानंद नाईक उल्हासनगर : चोरीला गेलेला एकून ७६ प्रकरणातील २३ लाख १८ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी टाऊन हॉल ...

उल्हासनगरात चोरीला गेलेला २३ लाखाचा मुद्देमाल परत
सदानंद नाईक
उल्हासनगर : चोरीला गेलेला एकून ७६ प्रकरणातील २३ लाख १८ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी टाऊन हॉल मध्ये पोलिसांनी नागरिकांना परत केला. अशी माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील चोरी प्रकरणातील ७६ प्रकरणाचा उलघडा पोलिसांनी केला असून एकून २३ लाख १८ हजाराचा माल हस्तगत केला. पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल शुक्रवारी सायंकाळी टाऊन हॉल मध्ये संबंधित नागरिकांनी परत केला. उल्हासनगर पोलीस ठाण्यातील २६ प्रकरणातील २१ मोबाईल, ४ मोटरसायकल व २४८ ग्राम सोन्याची लगड अशी एकून १० लाख ३ हजाराचा मुद्देमाल परत केला. तसेच मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ४२ प्रकरणातील ३५ मोबाईल, ७ मोटरसायकल तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील ८ प्रकरण मधील ३ मोबाईल व ७ मोटरसायकल असा एकून २३ लाख १८ हजाराचा मुद्देमाल परत केला. नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.