शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहे कैद्यांनी ओव्हर फ्लो, पण अधिकाऱ्यांची पदोन्नतीसाठी चढाओढ

By गणेश वासनिक | Updated: November 26, 2022 20:58 IST

१२ अधिकाऱ्यांचे पदोन्नतीचे प्रस्ताव गृह विभागाकडे सादर; पुणे, मुंबई जागेसाठी जोरदार फिल्डिंग

अमरावती : राज्यातील कारागृहे कैद्यांच्या गर्दीने ओव्हर फ्लो झाली आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त असली तरी १२ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव गृह विभागात धूळखात पडले आहेत. तर पदोन्नतीच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कारागृहांचे अधिकारी मंत्रालयात ठाण मांडून बसले असून, त्यांच्या फिक्सिंगच्या आकडेवारीने मंत्रालयातील अधिकारीसुद्धा मोहात पडल्याची माहिती आहे.

सर्वोच्च व उच्च न्यायालयाकडून कैद्यांना बहाल करण्यात आलेल्या मानवी हक्काची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार राज्य मानवी हक्क आयाेगाने केली होती. त्याअनुषंगाने कारागृहात मनुष्यबळाचा अभाव असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. रिक्त पदांमुळे कैद्यांना त्यांच्या मानवी हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही, ही बाब स्पष्ट केली. त्यामुळे राज्याचे मध्यवर्ती कारागृहे, जिल्हा कारागृहे असो वा महिला कारागृहे यातील रिक्त पदे दोन महिन्यांत भरती करून तसा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, कारागृह प्रशासनाने १२ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव महिनाभरापूर्वी गृह खात्याकडेपाठविला असताना अद्यापही याविषयी गृह विभागाने निर्णय घेतला नसल्याची माहिती आहे. परिणामी कारागृहातील कैद्यांची वाढती गर्दी अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक मानली जात आहे. पदाेन्नतीसंदर्भात पुणे कारागृह प्रशासनाच्या डीआयजी स्वाती साठे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, हे विशेष.

मुंबई, पुणे सोडणार नाही, विदर्भात पोस्टिंग घेणार नाहीमुंबई, पुण्याकडे कारागृहांमध्ये वर्षानुवर्षे मलईदार पदावर कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. मात्र, पदोन्नती हवी पण विदर्भात नको, अशी या अधिकाऱ्यांची मानसिकता आहे. त्यामुळे पदोन्नतीची यादी रखडत आहे. पदोन्नतीसाठी काही पात्र अधिकारी असताना त्यांचे जुने प्रकरण बाहेर काढण्याची शक्कल देखील लढवली जात आहे. आपण पदोन्नती घेताना मुंबई, पुण्याबाहेर जाऊ नये, अशी काही अधिकाऱ्यांची फिल्डिंग आहे.पदोन्नतीची फाईल उघडणार केव्हा?गृह विभागाकडे १२ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रस्तावाची फाईल पाठविली आहे. महिनाभरानंतरही या फाईलवर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती आहे. एकूण १२ पैकी सात अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. मात्र, पुणे, मुंबई हातून जाऊ नये, यासाठी मंत्रालयात लॉबिंग चालविली जात आहे. त्यामुळे पात्र अधिकाऱ्यांवर पदोन्नतीत अन्याय होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंग