शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कैदीच बनवतायेत ‘फांसी का फंदा’; निर्भयाच्या दोषींसाठी फास बनविण्याची तयारी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 17:04 IST

२०१३ साली संसदेवरील हल्ल्यातील दोषी मोहम्मद अफजल गुरूला फाशी देण्याचा फास याच कारागृहातून बनविण्यात आला होता

ठळक मुद्देनिर्भयाच्या दोषींसाठी ‘फांसी का फंदा' तयार केला जात असल्याची चर्चा सुरु आहे. गंगेच्या काठावर वसलेले बक्सर कारागृहाला फाशीचा फास बनविण्यासाठी खास ओळखले जाते. बक्सर कारागृहाचे अधीक्षक विजय कुमार अरोरा म्हणतात की, 'माझ्या वरिष्ठांनी मला फाशीसाठी १० फास  तयार ठेवण्यास सांगितले.

पाटणा - बिहार येथील बक्सर मध्यवर्ती कारागृहात फाशीसाठी लागणाऱ्या फास बनविण्याची तयारी सुरु आहे. बक्सर कारागृहातील कैदी हा फास तयार करीत आहेत. २०१३ साली संसदेवरील हल्ल्यातील दोषी मोहम्मद अफजल गुरूला फाशी देण्याचा फास याच कारागृहातून बनविण्यात आला होता आणि नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठविण्यात आले होते. यावेळी निर्भयाच्या दोषींसाठी ‘फांसी का फंदा' तयार केला जात असल्याची चर्चा सुरु आहे. अशी माहिती नवभारत टाईम्सच्या न्यूजपोर्टलवर देण्यात आली आहे.गंगेच्या काठावर वसलेले बक्सर कारागृहाला फाशीचा फास बनविण्यासाठी खास ओळखले जाते. असा समज आहे की या कारागृहात अतिशय मजबूत फास तयार केला जातो. या तुरुंगात फार पूर्वीपासून फास बनविला जात आहे. बक्सर कारागृहाचे अधीक्षक विजय कुमार अरोरा म्हणतात की, 'माझ्या वरिष्ठांनी मला फाशीसाठी १० फास  तयार ठेवण्यास सांगितले. हे फास कोणत्या तरुंगामधून मागितले गेले आहेत हे मला माहित नाही. मात्र, आम्ही त्यासाठी काम सुरू केले आहे.'तीन दिवसांपूर्वी आले निर्देशतीन दिवसांपूर्वी, बक्सर कारागृह अधीक्षकांना फास तयार करण्यासाठी निर्देश पाठविण्यात आले. नाव जाहीर न करता तुरूंगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, नुकतीच गृह मंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निर्भया दोषींची क्षमा माफी याचिका नाकारण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे याचवेळी हे निर्देश देणं म्हणजे निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात येऊ शकते असे चिन्ह दिसत आहेत'तीन ते चार दिवस लागतात 'फांसी का फंदा' बनवायलाएका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'अफझल गुरूचा फाशीचा फास बनविणारे काही कैदी अजूनही बक्सर कारागृहात आहेत. या कैद्यांना फास कसा बनवायचा हे चांगल्याप्रकारे माहित आहे. सात कैद्यांना तीन ते चार दिवस फास बनविण्यास वेळ लागतो.इतकी असते फाशीच्या दोरखंडाची लांबीअफझल गुरूला फाशी देण्यासाठी वापरलेल्या फासाची किंमत १७२५ रुपये होती. तथापि, आता सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत, तर आता त्याची किंमतही वाढणार आहे. फाशी देणार्‍या दोरखंड म्हणजेच फासाच्या लांबीबद्दल बोललं तर हे दोषी व्यक्तीच्या लांबीपेक्षा १.६ पट जास्त असतो.'... जेणेकरून वेळेवर फास तयार होईल'कारागृहाचे आयजी मिथिलेश मिश्रा सांगतात की, 'कोणत्याही दोषीला शिक्षा सुनावण्याच्या प्रक्रियेस उशीर होऊ नये. म्हणून फास आम्ही आधीच तयार करून ठेवतो. तसेच संबंधित कारागृहांना गरज पडल्यास ते आम्ही पुरवू शकतो.  

टॅग्स :jailतुरुंगBiharबिहारNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपNew Delhiनवी दिल्लीAfzal Guruअफजल गुरु