शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चिटफंडच्या सेमिनारवर छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 02:33 IST

नऊ जणांना अटक : नवी मुंबई, मुंबई तील अनेकांना कोट्यवधींचा गंडा

नवी मुंबई : आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊनच्या बहाण्याने कंपनी बंद करून त्यांनी कोट्यवधींचा अपहार केला आहे. मात्र, त्याच व्यक्ती नवी कंपनी स्थापन करून पुन्हा नागरिकांची लूट करत असल्याचे समजताच सुरू असलेल्या सेमिनारवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली.

नवी मुंबईसह मुंबई व ठाणे परिसरात स्मार्ट व्हिजन प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून चिटफंड चालवला जात होता. या कंपनीत जादा नफ्याच्या आमिषाला भुलून अनेकांनी पैसे गुंतवले होते. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत संबंधितांनी कंपनीचे कार्यालय बंद करून पोबारा केला होता, तर लॉकडाऊनमुळे कंपनी तोट्यात गेल्याचे कारण गुंतवणूकदारांना सांगण्यात आले होते. अशातच त्याच कंपनीच्या प्रमुख व्यक्तींनी दुसरी कंपनी स्थापन करून त्याच पद्धतीने नागरिकांची लूट चालवली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अमर देसाई यांच्या पथकाने रविवारी रात्री रॉयल ऑर्चिड हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेमिनारवर छापा टाकला.सदर बिजनेस सेमिनार रिचहूड क्लब नावाच्या कंपनीमार्फत सुरू होते. यावेळी पोलिसांनी कंपनीच्या संचालकांबाबत चौकशी केली असता, स्मार्ट व्हिजन कंपनीच्या प्रमुख व्यक्तींनीच रिचहूड नावाने नवीन कंपनी स्थापन केली असल्याचे समोर आले. त्यानुसार, नऊ जणांना अटक करून त्यांच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्यावर केली कारवाईn पोलिसांनी सेमिनारवर छापा टाकून आनंद रामचंद्र टोळे, प्रदीप छोटेलाल मौर्या, भूपेंद्र अशोककुमार मेराडा, विनायक तुकाराम मोरे, सतीश गुरुलिंगप्पा माजी, रविप्रकाश घेराडे, आनंद लक्ष्मण सकपाळ, अनिल शिवाजी भोईर व मिल्केराम उखाराम प्रजापती या नऊ जणांना अटक केली. त्यांनी दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याची शक्यता आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसfraudधोकेबाजी