शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मजूर प्रकरणात दरेकर यांना अटक; ३५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 09:35 IST

मुंबै बँकेच्या मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणात भाजप नेते प्रवीण दरेकर यांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी ३५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन जामीनदारांच्या हमीवर दरेकर यांना जामीन मंजूर केला आहे.

मुंबै बँकेच्या मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दरेकर यांना दिलासा देत या गुन्ह्यात अटक झाल्यास तात्काळ सुटका करण्याचे आदेश देत अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. 

दरेकर शुक्रवारी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी दरेकर यांना अटक दाखवून तात्काळ जामीन मंजूर केला आहे. अटकेच्या वृत्ताला पोलीस उपायुक्त एन. बालाजी यांनी दुजोरा दिला आहे. 

 दरेकर यांचे  सरकारवर आरोप पोलीस ठाण्यात हजर राहण्यापूर्वी दरेकर यांनी सरकारने राजकारण करत आपल्याला अडकवल्याचे म्हटले आहे. पोलीस ठाण्यात जास्तीत जास्त हजेरी लावण्याची ड्यूटी आमच्यामागे लावली जात आहे. आपल्याला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. फक्त कायदेशीर प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असल्याचे नमूद केले होते. मुंबई जिल्हा बँकेवर संचालकपदी विराजमान होऊन महापालिकेकडून अटींचे उल्लंघन होत आहे. विष्णू घुमरे यांचेदेखील निलंबन महापालिकेने केले आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरPoliceपोलिस