शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 06:49 IST

प्रज्वलविरोधात बलात्कार व लैंगिक अत्याचाराचे चार खटले सुरू असून, त्यातील एका प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी त्याला दोषी ठरविले...

बंगळुरू : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू, माजी खासदार आणि जनता दल (सेक्यूुर) या पक्षातून निलंबित केलेला नेता प्रज्वल रेवण्णा याला बलात्कार प्रकरणात खासदार-आमदारांसाठी असलेले विशेष न्यायाधीश संतोष भट यांनी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यांनी रेवण्णाला १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला, तसेच पीडित महिलेला ७ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

प्रज्वलविरोधात बलात्कार व लैंगिक अत्याचाराचे चार खटले सुरू असून, त्यातील एका प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी त्याला दोषी ठरविले. कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होळेनरसीपुरा येथील त्याच्या गणिकाडा फार्महाउसवर काम करणाऱ्या ४८ वर्षे वयाच्या महिलेवर त्याने दोन वेळा बलात्कार केला. हसनमधील फार्महाउस, तसेच बंगळुरूमधील निवासस्थानी त्याने हे गैरकृत्य केल्याचा आरोप होता. त्याने या कृत्याचे मोबाइलद्वारे चित्रीकरणही केले. २०२१च्या या प्रकरणात रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाने केली, तर मी काही चुकीचे केलेले नाही, मी काहीही चुकीचे वर्तन केलेले नाही, असे रेवण्णाने न्यायालयाला सांगितले.

राजकारणामध्ये मला लवकर यश मिळाले ही माझी मोठी चूक होती. त्यामुळेच माझ्यावर अनेक आरोप झाले, असा रेवण्णाने स्वत:चा बचाव केला. आपण कसे चांगले आहोत हे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. 

मला सौम्य शिक्षा द्या; रेवण्णाची कोर्टाला विनंतीरेवण्णा न्यायालयात भावुक झाला होता. त्याने सांगितले की, सहा महिन्यांपासून मी माझ्या आई-वडिलांना पाहिलेले नाही. माझे कुटुंबीय चिंतेत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मला कृपया सौम्य शिक्षा द्या. विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात सप्टेंबर २०२४ मध्ये १६३२ पानी आरोपपत्र दाखल केले. ११३ जणांच्या साक्षी झाल्या.

प्रज्वलने चित्रित केलेले व्हिडीओ ठरले सबळ पुरावेविशेष सरकारी वकील अशोक नायक व अतिरिक्त सरकारी वकील बी. एन. जगदीश म्हणाले की, न्यायालयाने सर्व आरोपांबाबत रेवण्णाला दोषी ठरवले. पीडितेची साक्ष, डिजिटल पुरावे, डीएनए अहवाल आणि फॉरेन्सिक प्रयोगशाळेचा अहवाल सादर करण्यात आला. आरोपीने स्वतः बलात्काराचे व्हिडीओ चित्रित केले होते. हे डिजिटल पुरावेही आरोप सिद्ध करण्यास महत्त्वाचे ठरले. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCourtन्यायालयSexual abuseलैंगिक शोषण