शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवादरम्यान गोव्यात अतिरेकी कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही : डीआयजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 21:02 IST

चतुर्थीसारख्या सणांच्यावेळी अशी शक्यता अधिक असते.

ठळक मुद्देगोवा पोलिसांकडून  सर्व प्रकारचे धोके लक्षात घेवून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कॅमऱ्यातील रेकॉर्डिंग किमान १५ दिवस ठेवावे असेही आवाहन त्यांनी केले. चतुर्थीच्या दिवसात पोलिसांच्या गस्ती अधिक होतील.

पणजी - गोवा हे जागतिक पर्यटन केंद्र असल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात गोव्यात अतिरेकी कारवायांची शक्यता नाकारता येत नाही अशी असे पोलीस उपमहानिरीक्षक परमादित्य यांनी विशेष पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. राज्यात सुरक्षेसाठी सर्व उपाय योजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उपमहानिरीक्षक परमादित्य म्हणाले, ‘गोवा हे अंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र आहे. जगभरातील लोक गोव्यात येतात. त्यामुळे अतिरेक्यांचेही लक्ष्य गोवा असू शकते आणि गोव्यात घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी अतिरेकी संघटना कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चतुर्थीसारख्या सणांच्यावेळी अशी शक्यता अधिक असते. गोवा पोलिसांकडून  सर्व प्रकारचे धोके लक्षात घेवून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.लोकांनीही सतर्क रहावे. संशयास्पद हालचाली दिसल्यास लोकांनी त्वरित पोलीसांना माहिती द्यावी. तसेच राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुरक्षा राखण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. गणेशोत्सव मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे लावावेत. कॅमऱ्यातील रेकॉर्डिंग किमान १५ दिवस ठेवावे असेही आवाहन त्यांनी केले. चतुर्थीच्या दिवसात पोलिसांच्या गस्ती अधिक होतील. शहरातून लोक आपल्या गावी जात असल्यामुळे शहरातील बंद घरांना चोरटे लक्ष्य करतात. अशा ठिकाणी पोलिसांच्या गस्ती वाढविल्या जातील. सुरक्षा कामात केंद्रातून अतिरिक्त पोलीस मागितले जाणार नाहीत, परंतु गोवा पोलीस खात्याचे सर्व मनुष्यबळ कामाला लावले जाईल. राखीव पोलीस, आयआरबीच्या कंपन्या आणि होमगार्डना सुरक्षा कामासाठी उतरविले जाईल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाterroristदहशतवादीPoliceपोलिसGanpati Festivalगणेशोत्सवtourismपर्यटन