शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोर्ट ट्रस्टच्या चुकीने पेन्शन खात्यात गेली तिप्पट रक्कम, २२ लाख पाहून निवृत्त कामगार झाला नॉट रिचेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 07:23 IST

pension: निवृत्तीनंतर हक्काच्या पेन्शनसाठी झगडावे लागण्याच्या घटना घडत असताना पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे निवृत्त कामगाराच्या बँक खात्यात ७ लाख रुपयांऐवजी पेन्शनची तिप्पट रक्कम गेली.

- मनीषा म्हात्रेमुंबई : निवृत्तीनंतर हक्काच्या पेन्शनसाठी झगडावे लागण्याच्या घटना घडत असताना पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे निवृत्त कामगाराच्या बँक खात्यात ७ लाख रुपयांऐवजी पेन्शनची तिप्पट रक्कम गेली. ही बाब लक्षात येईपर्यंत कामगाराने त्या रकमेची गुंतवणूक केली. सध्या ही रक्कम परत मिळविण्यासाठी पोर्ट ट्रस्टला पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजविण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.मुंबई पोर्ट ट्रस्टच्या लेखा विभागातील पेन्शन शाखेत कार्यरत असलेले असिस्टंट सुपरिंटेंडंट (पेन्शन शाखा) विजय दत्तात्रय निकम(५७)  यांच्या तक्रारीवरून   हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन, ग्रॅच्युइटी तसेच इतर लाभांबाबतचा लेखाजोखा तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने रक्कम अदा करण्याची जबाबदारी निकम यांच्यावर आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये किनारा कामगार या पदावर काम करणारे वांद्रे येथील प्रकाश दामोदर पाटील हे गेल्या वर्षी१ जून रोजी सेवानिवृत झाले. त्यांना सेवानिवृत्तीची २२ लाख ३७ हजार ५८१ इतकी रक्कम देणे  होते. त्यापैकी गेल्यावर्षी जुलै ते नोव्हेंबरदरम्यान त्यांना १४ लाख ४४ हजार २७५ रुपये देण्यात आले होते. पुढे ७ लाख ९३ हजार ३०६ रुपये पेन्शन विभागातर्फे देणे बाकी होते. मात्र, चुकून त्यांच्या खात्यात २२ लाख ३७ हजार ५८१ इतकी रक्कम २७ नोव्हेंबर रोजी जमा करण्यात आली.ही बाब लक्षात येताच यात पाटील यांना अतिरिक्त १४ लाख ४४ हजार २७५ रुपये परत करण्याबाबत १५ जानेवारी रोजी पत्राद्वारे कळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत पाटील यांनी या रकमेचा वापर केला होता. या पत्रानंतर पाटील यांनी रक्कम परत करण्यासाठी मुदत मागितली. मात्र, त्यानंतर वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी कॉल घेणेही बंद केले. अखेर पोर्ट ट्रस्टने गुरुवारी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यात सुरुवातीला नोटीस धाडून, त्यांना बोलाविण्यात येईल, असे एमआरए मार्ग पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसा