शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

Pornography Case : राज कुंद्राची अडचण वाढली! 4 कर्मचारी होणार सरकारचे साक्षीदार; क्राइम ब्रांचला सांगितले रॅकेटचे सर्व 'राज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 17:12 IST

क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठसह इतर तीन लोकांना आज चौकशीसाठी बोलावले आहे. पण...

Raj Kundra Pornography Case : पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राचे चार कर्मचारी  सरकारी साक्षीदार होणार आहेत. या कर्मचाऱ्यांनी मुंबई क्राइम ब्रांचला अश्लील फिल्म रॅकेटसंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे.

यासंदर्भात, क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठसह इतर तीन लोकांना आज चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, आपण सध्या मुंबई बाहेर असल्याचे गहना वशिष्ठने सांगितले आहे. यामुळे ती हजर होऊ शकणार नाही. तसेच, या प्रकरणाच्या तपासात आपण पूर्णपणे मदत करण्यास तयार आहोत, असेही तिने म्हटले आहे. 

शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहित असणार...! मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले

शिल्पा शेट्टी माझा काहीही संबंध नाही -मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, हॉटशॉट ॲपशी माझा काहीही संबंध नाही. माझा पती राज कुंद्रा याचा अश्लील चित्रपट बनविण्याशी काहीही संबंध नाही. माझा मेव्हणा प्रदीप बक्षी हा हॉट शॉट ॲपचा सर्व कारभार पाहतो. हॉटशॉट ॲपचे २० लाख ग्राहक आहेत. मढ समुद्रकिनाऱ्यावरील एका बंगल्यात फेब्रुवारी २०२१मध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकून अश्लील चित्रपट आणि वेबसिरिज बनविणाऱ्यांना अटक केली होती. याच प्रकरणात राज कुंद्रा यांनाही अटक करण्यात आली.

शिल्पा शेट्टीने एका निवेदनात म्हटले आहे की, माझा पती राज कुंद्रा हा निरपराध आहे. हॉटशॉट या ॲपवर झळकलेले चित्रपट कामुक आहेत पण अश्लील नाहीत असा दावा शिल्पा शेट्टी हिने एका निवेदनात केला होता.

राज कुंद्राच्या चाहत्यांकडून मिळाली बलात्कार, ठार मारण्याची धमकी; मॉडेलचा आरोप

राज कुंद्राला कथित पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली आहे. न्यायालयाने राजचे आयटी प्रमूख रयान थ्रोपसह त्याची पोलीस कोठडी 27 जुलैपर्यंत वाढवली आहे.  

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राShilpa Shettyशिल्पा शेट्टीbollywoodबॉलिवूडPoliceपोलिस