शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पोलीस कर्मचारी एकमेकांना भिडले, एकाने दुसऱ्याच्या डोक्यात घातला हातोडा; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 10:07 IST

कोटाच्या गुमानपुरा पोलीस ठाण्यात दोन पोलिसांची एकमेकांशी जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली.

कोटा : राजस्थान पोलिसांत सध्या वातावरण चांगले नाही. एकीकडे एसआय भरती परीक्षेत कॉपी करून वर्दी मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, कोटाच्या गुमानपुरा पोलीस ठाण्यात दोन पोलिसांची एकमेकांशी जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसाच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. त्यामुळे जखमी पोलिसाला रुग्णालयात दाखल करावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी कोचिंग सिटी कोटाच्या गुमानपुरा पोलीस ठाण्यात पोलिसांमध्ये हाणामारी झाली. हेड कॉन्स्टेबल बलबीर सिंह हे पोलीस ठाण्यात काही काळ गैरहजर होते. ड्युटी हजेरीच्या मुद्द्यावरून त्यांचा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुरेंद्र सिंह या आणखी एका पोलिसाशी बाचाबाची झाली. काही वेळातच दोघांमधील वाद वाढला. यानंतर  हेड कॉन्स्टेबल बलबीर सिंह यांनी तिथे ठेवलेला हातोडा उचलून सुरेंद्र सिंग यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे सुरेंद्र सिंह यांच्या डोक्याला दुखापत झाली.

या घटनेनंतर पोलीस ठाण्यातील इतर पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस ठाण्यातच ही घटना घडल्याने पोलीस अधिकारी हे प्रकरण दडपण्यात व्यस्त होते. मात्र, प्रकरण दाबता आले नाही. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत हेड कॉन्स्टेबल बलबीर सिंह यांना सायंकाळी उशिरा पोलीस ठाण्यातून निलंबित करण्यात आले.

गंभीर कलमान्वये गुन्हा दाखलआरोपी पोलीस कर्मचारी बलबीर सिंह यांच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या गुमानपुरा पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस ठाण्यात पोलिसांमध्ये घडलेली ही घटना विभागात चर्चेचा विषय बनली आहे. ही मारामारी हजेरीच्या मुद्द्यावरून झाली की, त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध पोलीस अधिकारी घेत आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी