शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पोलिसाचा मित्रच निघाला चोर; डोंगरी पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 02:52 IST

तो मोबाइल सुरू करता त्यातील फोन पे अ‍ॅप गायब असल्याचे लक्षात आले

मुंबई : गावी जाण्यापूर्वीच्या खरेदीदरम्यान मित्रानेच पोलिसाचा आधी मोबाइल चोरी केला. त्यानंतर, मोबाइलमधील फोन पे अ‍ॅपवरून २ लाखांवर हात साफ केल्याची घटना डोंगरीत घडली आहे. या प्रकरणी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चिंचपोकळी येथील रहिवासी असलेले वसंत माळी (४४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते भारतीय थलसेनेमधून २०१०मध्ये निवृत्त असून, सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वैयक्तिक वापराकरिता त्यांच्या मोबाइलमध्ये व्यवहारासाठी फोन पे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. १३ नोव्हेंबर रोजी मंत्रालय येथील ड्युटी उरकून, ३ दिवस सुट्टी असल्याने गावी जाण्यास निघाले. जाण्यापूर्वी खरेदी करण्यास ते सॅण्डहर्स्ट रोडच्या दिशेने निघाले. तेव्हा त्यांचा मित्र शिवानंद जगदाळे त्यांच्यासोबत होता. डोंगरी परिसरात येताच त्यांना मोबाइल गायब असल्याचे लक्षात आले. पण गाडी पकडण्याच्या नादात त्यांनी पोलिसांत तक्रार केली नाही. गाडी पकडल्यानंतर शेजारील व्यक्तीच्या मोबाइलवरून त्यांनी कॉल केले. मात्र मोबाइल नॉट रिचेबल होता. त्यानंतर मध्यरात्री ८ ते १० वेळा कॉल केल्यावर फोनची रिंग वाजली. त्यानंतर रात्री उशिराने कॉल उचलला. तेव्हा, समोरची व्यक्ती जगदाळे असल्याचे लक्षात आले. त्याने उडवाउडवीची उत्तरे देत फोन बंद केला. १७ नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबई गाठताच त्यांच्या रूम पार्टनरने जगदाळे १६ नोव्हेंबर रोजी मोबाइल देऊन गेल्याचे सांगितले.

तो मोबाइल सुरू करता त्यातील फोन पे अ‍ॅप गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी ते अ‍ॅप पुन्हा डाऊनलोड केले, तेव्हा पैसे डेबिट झाल्याचे लक्षात आले. १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान त्यांच्या खात्यातून २ लाख १० हजार रुपये काढल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत अर्ज केल्यानंतर ९ जानेवारी रोजी डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.संशयित पसारया प्रकरणातील संशयित व्यक्ती पसार असून त्याचा व्यक्तीचा शोध सुरू असल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी दिली आहे.

टॅग्स :Policeपोलिस