शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार करण्यापूर्वी पोलिसांनी उधळला खूनाचा डाव, जळगावची घटना

By सागर दुबे | Updated: February 20, 2023 17:17 IST

एक जण ताब्यात, साथीदार मित्र पसार; गावठी पिस्तूलसह पाच जिवंत काडतूस जप्त

सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शहर पोलिसांसह वाहतूक पोलिसाने तत्परता दाखविल्याने सोमवारी एक मोठा अनर्थ टळला आणि दोघांचे प्राणही वाचले. वर्षभरापूर्वी झालेल्या मुलाच्या खुनातील संशयित आरोपींना दुपारी न्यायालयात पोलिस हजर करणार होते. 'खून का बदला खून' म्हणून न्यायालयाच्या बाहेरच दोघांवर गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा बापाचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. हा संपूर्ण थरार सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस घडला.

दरम्यान, पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नातील बापाला पोलिसांनी पकडले असून त्याचा साथीदार मात्र तेथून पसार होण्यात यशस्वी झाला आहे. मनोहर आत्माराम सुरळकर (४६, रा. भुसावळ) असे अटक केलेल्याचे तर सुरेश रवी इंधाटे (रा. भुसावळ) असे फरार संशयिताचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी पिस्तूल व पाच जीवंत काडतूस जप्त केले आहे.

काय होती घटना?

लहान मुलांच्या भांडणातून दोन वर्षापूर्वी भुसावळातील पंचशील नगरामध्ये कैफ शेख जाकीर या तरूणाचा खून झाला होता. या गुन्ह्यात धम्मप्रिया मनोहर सुरळकर (१८) याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सप्टेंबर-२०२१ मध्ये धम्मप्रिया याची जामिनावर मुक्तता झाल्यावर मनोहर सुरळकर व धम्मप्रिया हे पिता-पुत्र घरी जात असताना सुनसगाव पुलाजवळ सिगारेट घेण्यासाठी थांबले. तेव्हा धम्मप्रिया याच्यावद दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला तर त्याच्या वडीलांवर चाकूने सपासप वार केले. या गोळीबारात धम्मप्रिया यांचा मृत्यू झाला होता. नशिराबाद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शेख शमीर उर्फ समीर शेख जाकीर आणि रेहानुद्दीन उर्फ भांजा नईमोद्दीन यांना अटक केली होती. डोळ्या देखत मुलाचा खून केला म्हणून वडीलांच्या मनात बदल्याची आग घुमसत होती.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी