शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहर  वाहतूक शाखेत मजनूगिरी करणारा पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:21 IST

मोबाईलवर आपत्तीजनक मेसेज पाठवून बदनामी केल्यामुळे स्वत:च्या विभागातील एका महिला पोलिसाकडून कानशेकणी झालेल्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले.

ठळक मुद्देमहिला सहकाऱ्याकडून कानशेकणी : वरिष्ठांकडून कारवाईची चपराक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईलवर आपत्तीजनक मेसेज पाठवून बदनामी केल्यामुळे स्वत:च्या विभागातील एका महिला पोलिसाकडून कानशेकणी झालेल्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले. शुक्रवारी या कारवाईची माहिती उघड झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली.नंदू तायडे नामक हा पोलीस कर्मचारी वाहतूक शाखेच्या इंदोरा कार्यालयात कार्यरत होता. सदर महिला पोलीस वाहतूक शाखेच्या जरीपटका विभागात कार्यरत आहे. तेथेच नंदू काम करतो. महिला आणि नंदूमध्ये अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. त्याची कल्पना सोबत काम करणाऱ्या अनेक पोलिसांनाही होती. मात्र, कुणीच त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढतच गेला. दरम्यान, सोमवारी ६ जानेवारीच्या रात्री ८ च्या सुमारास महिला तिच्या पतीसह वाहतूक पोलिसांच्या इंदोरा कार्यालयात पोहचली. ‘तू मला वारंवार त्रास का देतो, अशी तिने नंदूला विचारणा केली तर तिच्या पतीने नंदूला पत्नीची विनाकारण बदनामी कशाला करतो’, असे विचारत पती-पत्नीने नंदूची कानशेकणी केली. वर्दळीच्या ठिकाणी इंदोरा चौकातील कार्यालयात हा प्रकार घडल्याने आजूबाजूच्यांनी तेथे मोठी गर्दी केली होती. वृत्तपत्रातून दुसऱ्या  दिवशी त्याचा बोभाटा झाला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी करून घेतली. घटनेनंतर दोन्हीकडून तक्रार देण्यास इन्कार करण्यात आल्याने प्रकरणावर पडदा पडण्याची चर्चा सुरू झाली असतानाच वरिष्ठांनी मात्र त्याची गंभीर दखल घेतली. गुरुवारी रात्री नंदूच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. विशेष म्हणजे, अशीच काही प्रकरणे वर्षभरात शहर पोलीस दलात घडली. मात्र, विनयभंगाचा आरोप अन् बदलीची जुजबी शिक्षा मिळाल्याने मजनुगिरी करणाऱ्या पोलिसांवर फरक पडला नाही. या कारवाईमुळे मात्र मजनूगिरी करणारांना चाप बसण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Policeपोलिसsuspensionनिलंबन