शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांच्या लाचेप्रकरणी हवालदार बडतर्फ    

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 17:13 IST

मृत्युच्या दाखल्या संदर्भात दिलेला रिपोर्ट बदलण्याकरिता पोलीस हवालदाराने तीन लाख रुपयांची लाच स्वीकारली.

पुणे : मंचर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मृत्युच्या दाखल्या संदर्भात दिलेला रिपोर्ट बदलण्याकरिता एका पोलीस हवालदाराने तीन लाख रुपयांची लाच स्वीकारली. याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी संबंधित हवालदाराला सेवेतून बडतर्फ केले आहे.  पोलीस हवालदार राजेंद्र गोपाळ आर्य असे कारवाई केलेल्याचे नाव आहे. राजेंद्र  हा सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलात नेमणुकीस होता. मयत प्रियंका शिंदे यांच्या मृत्युचा अहवाल मंचर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी यापूर्वी दिला होता. त्यात बदल करण्याकरिता आर्य याने तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती आणि लाच स्वीकारली. त्यानुसार राजेंद्र यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्याला अटक केली. पोलीस अधीक्षक पाटील यांनी  या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राजेंद्र याला सेवेतून बडतर्फ केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरCrime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचार