शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस माने मला त्रास द्यायचा, गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 11:41 IST

सुनील माने मला सतत फोन करून मानसिक त्रास देत होता, तर चिमाजी आढाव आणि अकबर पठाण माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचा आरोप खंडणी प्रकरणातील तक्रारदार गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. वर्षभर आम्ही न्यायासाठी राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवले. सुनील माने मला सतत फोन करून मानसिक त्रास देत होता, तर चिमाजी आढाव आणि अकबर पठाण माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचा आरोप खंडणी प्रकरणातील तक्रारदार गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीने केला आहे.

चौहान यांच्या म्हणण्यानुसार, हे तिन्ही पोलीस अधिकारी माझ्या पतीला सतत त्रास देत होते. ‘तुम्ही मोठे व्यावसायिक आहात त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे द्यायचे, अन्यथा तुम्हाला खोट्या आरोपात अडकवेन,’ अशी धमकी डीसीपी पठाण तसेच माने व आढाव यांच्याकडून दिली जात होती. मला सुनील माने वेळी अवेळी फोन करून माझा मानसिक छळ करायचा, तर पठाण व आढाव हे माझ्या नवऱ्याला खोट्या प्रकरणात अडकवेन, पत्नीवर गुन्हा दाखल करेन, अशी धमकी द्यायचे. पत्नीला पैसे आणायला सांग, असेही रात्री त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. घर विका, दागिने विका; पण आम्हाला पैसे आणून द्या, असे म्हणत आमचे खच्चीकरण केले. आम्हाला घरातून बाहेर पडण्याची मुलांना बाहेर पाठविण्याची भीती वाटायची. रक्षणासाठी असलेलेच भक्षण करण्याचा प्रयत्न करू लागले तर दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न समोर होता. 

...म्हणून घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

  • आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तात्कालिक गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त परमबीर सिंह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे २०२० साली याबाबत तक्रार केली. 
  • कोणीच माझ्या मदतीला आले नाही. त्यामुळे आम्ही अखेर सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने अंधेरी कोर्टात जाण्याचा सल्ला देत न्याय न मिळाल्यास पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याची मुभा दिली. त्यानंतर अंबोली पोलिसांनी आमची तक्रार दाखल केली, असे चौहान म्हणाल्या.
टॅग्स :Policeपोलिस