शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लूकआऊट नोटिशीमुळे नरेंद्र मेहतांना परदेशात जाण्यापासून रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 09:48 IST

मेहता यांच्याविरुद्ध त्यांच्या एकेकाळच्या मैत्रिणीने सुमारे दीड वर्षापूर्वी मीरा रोड पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलिसांकडे होता.

- जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भाजपच्या एका नगरसेविकेने केलेल्या लैंगिक अत्याचार आणि ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यामध्ये लूकआऊट नोटीस असल्यामुळे मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना बुधवारी इमिग्रेशन विभागाने मालदीवला जाण्यापासून रोखले. त्यानंतर ठाणेपोलिसांनीही त्यांची चौकशी केली. त्यामुळे फिरायला जाण्याच्या मूडमध्ये असलेल्या मेहतांची पंचाईत झाली.

मेहता यांच्याविरुद्ध त्यांच्या एकेकाळच्या मैत्रिणीने सुमारे दीड वर्षापूर्वी मीरा रोड पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलिसांकडे होता. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर हे प्रकरण ठाणे शहर पोलिसांकडे गृह विभागाने वर्ग केले. याच गुन्ह्यात मेहता यांच्याविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली होती. मेहता हे कुटुंबीयांसह २५ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी मालदीवला जाण्याच्या बेतात होते. त्यांनी परतीच्या फ्लाईटचेही तिकीट आरक्षित केले होते. परंतु ग्रामीण पोलिसांनी आधीच काढलेल्या लूकआऊट नोटीसमुळे इमिग्रेशन विभागाने त्यांना विमानतळावरच रोखले. त्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयाला देण्यात आली. त्याच आधारे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची विमानतळावरच चौकशी केली. या चौकशीमध्ये फिरायला जाण्यासाठी परदेशी (मालदीवला) जात असल्याचा दावा त्यांनी केला.

मात्र, चौकशीला संपूर्णपणे पोलिसांना सहकार्य करणार असल्याची हमीही त्यांनी दिली. शिवाय, याच गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला असल्याने अटक न करण्याचेही न्यायालयाचे निर्देश असल्याची कागदपत्रेही पडताळण्यात आली.  पोलिसांना यासंदर्भातील माहिती मेहतांनी आधीच दिली असती तर त्यांना कदाचित रोखण्यात आले नसते. आता २५ ऐवजी २६ ऑगस्टला ते पुन्हा मालदीवला जाणार असून त्यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात ॲट्राॅसिटीचा गुन्हाही रद्द झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस