शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video: राज्यभर लॉकडाऊन; नागपुरात हुक्का पार्लरमध्ये तरुण, तरुणीही झिंगलेल्या अवस्थेत सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 00:50 IST

hookah parlor opens in Nagpur: शासनाने यापूर्वीच हुक्का पार्लर वर बंदी घातली आहे. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे हॉटेल तसेच रेस्टोरेंटही ग्राहकांसाठी बंद करण्यात आले आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाने बंदी घातली असतानादेखील बिनधास्त सुरू असलेल्या शहरातील दोन हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री छापे घातले. या छाप्यात दोन्ही ठिकाणी एकूण २२ तरुण-तरुणी हुक्याचा धुर उडविताना आढळले. (Nagpur police raids on two hookah parlor )

 शासनाने यापूर्वीच हुक्का पार्लर वर बंदी घातली आहे. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे हॉटेल तसेच रेस्टोरेंटही ग्राहकांसाठी बंद करण्यात आले आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे.  मात्र, शहरातील अंबाझरी तसेच सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना मिळाली. त्यांनी आपल्या विशेष पथकाला एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापे घालण्याचे आदेश दिले.

त्यानुसार  शुक्रवारी रात्री अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतनगर मध्ये हवेली कॅफे नामक हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घातला. येथे कॅफे मालक प्रेम जोरणकर आणि प्रीतम यादव त्याचे दोन कर्मचारी आणि सात तरुण तरुणी पोलिसांनी ताब्यात घेतले. येथून रोख रक्कम, हुक्का फ्लेवर, पॉट आणि अन्य साहित्य असा एकूण एक लाख, १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 त्याचप्रमाणे सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फ्युजन हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घातला. तेथे ११ तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले. त्या ठिकाणी वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरू होती.

तरुणीही हुक्क्याच्या धुरात या दोन्ही ठिकाणी तरुणांसोबतच तरुणीही मध्य हुक्क्याच्या धुरात  झिंगत असल्याचे चित्र पोलिसांना दिसले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मात्र त्या सर्वांची नशा उतरली होती.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस