गणेशोत्सवापूर्वी पोलिसांची अवैध दारु विक्रेत्यांवर छापेमारी; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By सचिन राऊत | Published: September 16, 2023 12:37 PM2023-09-16T12:37:18+5:302023-09-16T12:37:46+5:30

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Police raid illegal liquor sellers ahead of Ganeshotsav; One and a half lakh worth of goods seized | गणेशोत्सवापूर्वी पोलिसांची अवैध दारु विक्रेत्यांवर छापेमारी; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गणेशोत्सवापूर्वी पोलिसांची अवैध दारु विक्रेत्यांवर छापेमारी; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

googlenewsNext

अकोला : पोळा व गणेशोत्सव काळात दारुची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील विविध पाच ठिकाणांवर छापेमारी करीत दीड लाख रुपयांचा दारुसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे गेटजवळ विवेक अनिल मालगे वय ३० वर्ष, यशवंत राजु करनेवार वय २६ वर्ष दोन्ही रा. बाळापुर नाका गुरुदेव जगर यांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून दारुसह ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन गोविंदा अवारे वय ३५ वर्ष सुनिल गणेश रहाटे वय ४३ वर्ष दोन्ही रा. बाळापुर वेस, वाडेगाव ता. बाळापुर यांच्याकडून ६० हजार रुपयांचा मुद्देगाल जप्त करण्यात आला. 

बाळापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिथोरा गावात देशी व विदेशी दारू विक्री व वाहतुक सुरु असतांना रविराज अन्ना तायडे वय २८ वर्ष रा. रिधोरा याच्याकडून ६० हजार रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Web Title: Police raid illegal liquor sellers ahead of Ganeshotsav; One and a half lakh worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.