शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; असा रचला सापळा 

By धीरज परब | Updated: January 25, 2023 21:34 IST

भाईंदर पूर्वेच्या गोडदेव - फाटक मार्गावर असलेल्या अन्ना पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बार मधील गायिकांकडून अश्लील नाच करवून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती.

मीरारोड - भाईंदर पूर्वेचे भाजपचे माजी नगरसेवक गणेश शेट्टी यांच्या अन्ना पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बेकायदेशीरपणे अश्लील नाच चालत असल्याप्रकरणी पोलिसांनी धाड टाकून गुन्हा दाखल केला आहे. 

भाईंदर पूर्वेच्या गोडदेव - फाटक मार्गावर असलेल्या अन्ना पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बार मधील गायिकांकडून अश्लील नाच करवून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली. उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर अहिरराव सह उमेश पाटील, सम्राट गावडे, अश्विनी भिलारे यांच्या पथकाने सापळा रचला.  बोगस गिऱ्हाईक पाठवून खात्री होताच २३ जानेवारीच्या मध्यरात्री पोलीस पथकाने छापा टाकला. बारमध्ये सिंगर म्हणून ठेवलेल्या तरुणींकडून अश्लील नाच करवून घेतला जात होता. 

छाप्यात रोख १०,५२० रुपये, चित्रीकरण केलेली क्लीप जप्त करुन नमुद बारचा रोखपाल, चालक, ८ वेटर, १ पुरुष गायक अश्या ११ जणांसह बार  मालक वर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी देखील सदर बार वर पोलिसांनी अनेकवेळा छापेमारी केली असून पिटा सारखे गंभीर गुन्हे गणेश शेट्टी सह संबंधितांवर दाखल आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर