शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पोलिसांची धाड! हुक्का पार्लर चालवणारा नगरसेविकेचा जावई फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 20:09 IST

पेणकर पाड्यातील हुक्का पार्लवर पोलीसांची धाड

ठळक मुद्देहुक्का पार्लर चालवणारा मनीष मकवाना पसार असून तो स्थानिक नगरसेविका अनिता पाटील यांचा जावई आहे.हुक्का पार्लरचा चालक तथा मालक असलेला मनीष मकवानावर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला

मीरारोड - काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हदद्दीत पेणकरपाडा भागात एका गाळळ्यात चालवल्या जाणाराया हुक्का पार्लरवर पोलीसांनी धाड टाकुन पाच जणांना अटक केली आहे. तर सदर हुक्का पार्लर चालवणारा मनीष मकवाना पसार असून तो स्थानिक नगरसेविका अनिता पाटील यांचा जावई आहे.अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे यांना मिळालेल्या माहिती नंतर त्यांनी चौधरी, इंगळे, तावरे, गावडे, वैशाली आव्हाड या पोलीस कर्मचारायांसह पेणकर पाडा येथील न्यु लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये  तिसऱ्या मजल्या वरील एका गाळ्यात सोमवारी रात्री धाड टाकली. काशिमीरा पोलीस देखील सोबत होते.बेकायदा चालवल्या जाणाऱ्या या हुक्का पार्लर मध्ये संकेत सुरेश म्हात्रे (२४) रा. म्हात्रे निवास, शंकर मंदिर जवळ, पेणकरपाडा व शेजारी राहणारा सोमेश महादेव काळे (२०) हे हुक्का ओढत बसले होते. पोलीसांनी त्या दोघांसह हुक्का पार्लरचा व्यवस्थापक मुजिबुर खान (२१) रा. कांचन अपा. ठाकुर व्हिलेज, कांदिवली, रोखपाल रुद्रेश रविंद्र पवार (२२) रा. गावंड चाळ, पेणकरपाडा व वेटर इम्रान शेख (२१) अशा एकूण पाच जणांना अटक केली.मंगळवारी काशिमीरा पोलीस ठाण्यात या पचा जणांसह हुक्का पार्लरचा चालक तथा मालक असलेला मनीष मकवानावर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मकवाना हा पसार झाला असून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे म्हणाले. मकवाना हा स्थानिक नगरसेविका अनिता जयवंत पाटील यांचा जावई आहे. पाटील ह्या शिवसेनेच्या तिकीटावर निवडुन आल्या असल्या तरी त्यांनी अमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. पाटील यांच्या भाजपा प्रवेशा वरुन शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात निदर्शने केली होती. नगरसेविकेचा जावईच हुक्का पार्लर चालवत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

टॅग्स :raidधाडPoliceपोलिसmira roadमीरा रोडArrestअटक