शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोपर खैरणेतील डान्सबारवर पोलिसांचा छापा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:05 IST

याप्रकरणी बारबाला व ग्राहक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवी मुंबई : कोपर खैरणेतील मेट्रो या डान्सबारवर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली. शहरात काही ठिकाणी डान्सबार चालत असल्याची माहिती समोर येताच ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी बारबाला व ग्राहक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अवैध धंद्यांना थारा न देण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश असतानाही ठिकठिकाणी डान्सबार, हुक्का पार्लर तसेच मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री चालत आहे. आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार घेतल्यानंतर या अवैध धंद्यांना पूर्णपणे लगाम लागला होता. मात्र काही महिन्यातच पुन्हा अवैध धंदे पूर्ववत होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यात पहाटे पर्यंत चालणाऱ्या डान्सबारच्या माध्यमातून मोठे अर्थकारण होत आहे. 

बारचालक व अधिकारी यांच्यात समन्वय घडवणाऱ्या तुर्भेतील शेट्टीमार्फत ही माया जमा केली जात असल्याच्याही चर्चा आहेत. अशातच कोपर खैरणे येथील मेट्रो बारमध्ये डान्सबार चालवला जात असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत कोपर खैरणे पोलिसांना माहिती मिळताच शुक्रवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी तिथल्या बारबाला ग्राहकांसोबत अश्लील नृत्य करताना आढळून आल्या. 

याप्रकरणी त्यांच्यावर कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील सानपाडा व इतर ठिकाणी पहाटेपर्यंत चालणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. अशा कारवायांमधून शहर रात्रीच्या वेळी अद्यापही छुपा अवैध धंदा चालत असल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई