शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्याचं पोलीस महिलेशी होतं लफडं, बायकोने रंगेहाथ पकडलं अन् ...

By पूनम अपराज | Updated: December 12, 2020 20:19 IST

Crime News : मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हा प्रकार घडला. 

ठळक मुद्दे सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक (ASI) असलेल्या पतीला तिने पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मुरार ठाणे पोलीस ठाण्यात महिलेने या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

मध्यप्रदेशात पोलिसालाच त्याच्या पत्नीने रंगेहाथ प्रेयसीसोबत पकडले. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यानंतर सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक (ASI) असलेल्या पतीला तिने पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हा प्रकार घडला. 

या प्रकरणातील पीडित महिलेला नवऱ्यावर संशय होता. तो प्रेयसीसोबत ग्वाहलेरमधल्या एका फ्लॅटमध्ये असल्याचे माहिती तिला समजते आणि ती नातेवाईकांसह अचानक त्या फ्लॅटवर पोहचते आणि दरवाजा ठोठावते. त्यावेळी नवऱ्याचे पितळ उघडं होतं. 

पत्नीला दारावर पाहिल्यानंतर तिच्या नवऱ्याची आणि प्रेयसीची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष सांगायचे म्हणजे ती प्रेयसी देखील पोलीस कर्मचारी आहे. दरवाजा ठोठावल्यानंतर त्यांनी सुरुवातीला दार उघडण्याचं टाळलं, मात्र घराबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांना अखेर दार उघडावं लागलं. पीडित महिला आणि नातेवाईकांनी घराची पाहणी केल्यानंतर त्यांना घरात महिलेचे कपडे आढळले. सुरुवातीला नवऱ्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. प्रेयसी बाथरुममध्ये लपली होती. महिलेच्या नातेवाईकांनी बाथरुमचा दरवाजा तोडण्याची धमकी दिल्यानंतर नाइलाजास्तव तिला बाहेर पडावं लागलं. प्रेयसीला पाहताच पीडित महिला आणि नातेवाईकांचा राग अनावर झाला. त्यांनी दोघांचीही चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर मुरार ठाणे पोलीस ठाण्यात महिलेने या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक न करता सोडून दिल्याने पीडित महिलेने नाराजी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी