'चुकांमुळे जीवन संपवतो' असं सुसाईट नोटमध्ये लिहून पोलीस अधिकाऱ्याने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 08:54 PM2021-02-07T20:54:24+5:302021-02-07T20:54:51+5:30

Suicide : नोकरी करताना खूप चुका झाल्यात, त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे तांबे यांनी हस्तलिखित चिठ्ठीत नमूद केले आहे.

A police officer committed suicide by writing in a suicide note that 'mistakes end one's life' | 'चुकांमुळे जीवन संपवतो' असं सुसाईट नोटमध्ये लिहून पोलीस अधिकाऱ्याने केली आत्महत्या

'चुकांमुळे जीवन संपवतो' असं सुसाईट नोटमध्ये लिहून पोलीस अधिकाऱ्याने केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देपोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक अतुल रमेश तांबे (३४, रा. अमरावती) यांनी शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघड झाली.

धारणी (अमरावती) : धारणी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक अतुल रमेश तांबे (३४, रा. अमरावती) यांनी शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघड झाली. पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येने पोलीस दल ढवळून निघाले. धारणी पोलिसांनी घटनास्थळाहून सुसाईड नोट ताब्यात घेतली. नोकरी करताना खूप चुका झाल्यात, त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे तांबे यांनी हस्तलिखित चिठ्ठीत नमूद केले आहे.


अतुल तांबे हे दीड वर्षांपासून धारणी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पंचायत समितीच्या अखत्यारितील शासकीय क्वार्टमध्ये ते पत्नी किरण व मुलगी आद्या हिच्यासोबत राहत होते. कोरोना काळात त्यांनी धारणीत बंदोबस्त केल्यानंतर चार महिन्यांआधी त्यांची अमरावती येथे स्थानिक गुन्हे शाखेकडे असलेल्या धारणी येथील प्रकल्प कार्यालयातील अफरातफरी प्रकरणाच्या विशेष चौकशी पथकात नियुक्ती झाली होती. तेव्हापासून ते परिवारासह अमरावती येथे राहत होते.
             

तो तपास संपल्याने ते शनिवारी अमरावतीहून धारणीला आले. रविवारी ते धारणी पोलीस ठाण्यात रुजू होणार होते. परंतु सेवेत रुजू न होता, रविवारी सकाळी त्यांनी आपल्या निवासस्थानाच्या समोरच्या दाराला कुलूप लावले. मागील बाजूने घरात जात पहिल्या खोलीतील खिडक्यांना पडदे लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, रविवारी दुपारी पत्नी किरण, दोन वर्षांची लहान चिमुकली आद्या व अतुल यांचे वडील असे तिघे खासगी बसने धारणीला आले. समोरील दरवाज्याला कुलूप दिसल्याने त्यांचे वडील व पत्नीने मागील दरवाज्याने प्रवेश केला असता अतुल तांबे यांचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळला. पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी धारणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या घटनेने धारणी पोलीस ठाण्यातील त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी शोकविव्हळ झाले आहेत. एक उमदा तरुण अधिकारी आम्ही गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: A police officer committed suicide by writing in a suicide note that 'mistakes end one's life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.