पिंपरी : महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच महिलेच्या वडिलांना व बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी जवळीक प्रस्थापित केली. त्यानंतर महिलेवर वारंवार अत्याचार केले. महिलेने लग्नाची मागणी केली असता तिला नकार दिला. याबाबत मोटार वाहन परिवहन विभाग पुणे शहर येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला बलात्कार व अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. ही घटना २०१६ ते २०१८ या कालावधीत वडमुखवाडी, चऱ्होली, आळंदी याठिकाणी घडली. याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार, शुभम गजानन मोहिते (रा. पाटील नगर, धनकवडी) असे अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१६ ते २०१८ या कालावधीत आरोपी शुभम याने फियार्दी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लग्नाची मागणी घातली. त्यासाठी महिलेने नकार दिला. शुभम यांने आपल्यासोबत लग्न न केल्यास महिलेच्या वडिलांना व बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर महिलेने शुभमकडे लग्नाची मागणी केली. मात्र शुभम याने यास साफ नकार दिला. महिलेने याबाबत तक्रार केल्यास तिचे वडील आणि बहिणीची सरकारी नोकरी घालविण्याची धमकी दिली. झालेला सर्व प्रकार फिर्यादी महिलेने शुभम याच्या आई व बहिणीला सांगितला. त्याच्या आई आणि बहिणीने देखील महिलेला वाईट वागणूक दिली. याबाबत महिलेने दिघी पोलिसात धाव घेत बलात्कार व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
वडील आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, पोलीस शिपायाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 13:59 IST
महिलेच्या वडिलांना व बहिणीला जीवे मारण्याची धमकी
वडील आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, पोलीस शिपायाला अटक
ठळक मुद्देशिपायाला बलात्कार व अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक