शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

पोलिसाची बापाने केली हत्या, कौटुंबिक कलहातून कोयत्याने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 13:52 IST

मृत मुलगा अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत

ठळक मुद्देयाप्रकरणी पवई पोलिसांनी वडिलांना अटक केली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी सांगितले. हरीश हा दारूच्या नशेत सतत कुटुंबियांना त्रास देत असल्यामुळे घरात होणाऱ्या वादामुळे वडील गुलाब (६५) हे कंटाळले होते.

मुंबई - कौटुंबिक कलहातून अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाची राहत्या घरात पित्यानेच कोयत्याने हत्या केल्याची खळबळजनक घटना पवईतील पंचकुटीर येथील गणेश नगरात घडल्याने, एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी वडिलांना अटक केली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी सांगितले. 

हरीश गलांडे (४०) असे हत्या करण्यात आलेल्या पोलीस शिपायाची नाव आहे. हरीश हा अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होता. हरीश हा पवईतील पंचकुटीर येथील गणेश नगर येथे पत्नी मुले आणि आई वडीलांसोबत राहत होता. हरिशला दारूचे व्यसन होते, त्यातच काही वर्षांपासून तो आर्थिक अडचणीत होता अशी माहिती समोर येत आहे. हरीश हा दारूच्या नशेत सतत कुटुंबियांना त्रास देत असल्यामुळे घरात होणाऱ्या वादामुळे वडील गुलाब (६५) हे कंटाळले होते. त्यातच सोमवारी रात्री हरीश हा दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने पत्नी आणि आई वडिला सोबत वाद घालण्यास सुरुवात केली, या वादातून हरिशने वडिलांच्या दिशेने काचेची बाॅटल भिरकावली असता संतापलेल्या वडिलांनी जवळच पडलेला कोयता हरिशच्या डोक्यात घातला, सपासप वार बसताच हरीश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. 

त्यानंतर देखील वडील गुलाब यांनी कोयत्याने हरिशवर वार करून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वडील गुलाब यांना ताब्यात घेऊन जखमी हरीश गलांडेला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात आणले असता डाॅक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पवई पोलिसांनी वडील गुलाब यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुधाकर कांबळे यांनी दिली. तर याचा अधकि तपास सुरु आहे. हरीशच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. हरीशचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे देखील त्याचे पत्नी आणि घरातल्यांशी खटके उडत असत अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखूनArrestअटक