पिंपरी : दिघी परिसरात बेकायदा गोमांस वाहतूक करणाऱ्या मोटारीला रविवारी रात्री 11 च्या सुमारास अडविण्याचा प्रयत्न दिघी पोलिसांनी केला. मात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या अंगावर आरोपीने मोटार घातली. त्यात पोलीस कॉन्स्टेबल सुरेश शिंदे जखमी झाले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
मोटारीतून गोमांस वाहतूक केली जात असल्याची माहिती दिघीतील नागरिकांना मिळाली, त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली, गस्तीवरील पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली, गोमांस वाहतुक करणाऱ्या मोटारीला अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र मोटार चालकाने त्या पोलिसांच्या अंगावर मोटार घातली. त्यात पोलीस कर्मचारी शिंदे जखमी झाले. मोटार तेथेच सोडून आरोपी पळून गेले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. अद्याप याप्रकारणी पोलिसांकडे गुन्हा दाखल झालेला नाही