शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पोलीस हवालदाराची आत्मदहनाची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 23:26 IST

पोलीस मुख्यालयात बदली झाली म्हणून दुखावलेल्या एका पोलीस हवालदाराने चक्क आत्मदहनाचा धमकीवजा इशारा वरिष्ठांना दिला आहे. त्याच्या या इशारावजा धमकीने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे‘इशाारा पत्र’ व्हायरल : पोलीस दलात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस मुख्यालयात बदली झाली म्हणून दुखावलेल्या एका पोलीस हवालदाराने चक्क आत्मदहनाचा धमकीवजा इशारा वरिष्ठांना दिला आहे. संदीप शरद गुंडलवार (वय ५२) असे त्याचे नाव आहे. त्याच्या या इशारावजा धमकीने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.अयोध्यानगरात राहणारा गुंडलवार हुडकेश्वर ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेत (डीबी पार्टी) कार्यरत होता. या भागात गुन्हेगारी वाढल्याने वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेत हुडकेश्वर तसेच सक्करदरा पोलीस ठाण्यातील डीबी पथके शनिवारी बरखास्त केली. निष्क्रियतेचा ठपका ठेवून दोन्ही डीबी पार्टीतील २० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या मुख्यालयात केल्या. त्या २० पोलिसांमध्ये गुंडलवारचेही नाव आहे. हे बदली प्रकरण गुंडलवारने भलतेच मनावर घेतले आहे. तडकाफडकी करण्यात आलेल्या या बदलीमुळे आपण खूप दुखावलो आहे, असे सांगून त्याने दोन पानाचा अर्जच हुडकेश्वर ठाणेदाराच्या नावे लिहिला. २६ जानेवारीला तो पोलीस ठाण्याच्या ड्युटी अधिकाऱ्याला हा अर्ज देऊन त्याची प्रत गुंडलवारने मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्तांसह खात्यातील वरिष्ठांना पाठविल्या. आपण १९९१ ला पोलीस दलात रुजू झालो, स्वत:ला कर्तव्यदक्ष आणि सक्षम पोलीस म्हणवून घेत गुंडलवारने एक लुटमारीचा गुन्हा घडल्यानंतर वरिष्ठांनी अश प्रकारे तडकाफडकी बदली करणे, अन्यायकारक आहे, असे म्हटले आहे. आपल्याला ते अन्यायकारक वाटत असल्याचे सांगून त्यामुळेच आपण २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आत्मदहन करणार असल्याचेही अर्जात नमूद केले आहे. त्याच्या या अर्जाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.गुंडलवारचे सवाल!या धमकीवजा इशारा पत्रात हवालदार गुंडलवारने अनेक प्रश्न केले आहेत. कोणत्याही गुन्ह्याला केवळ डीबी पार्टीतीलच पोलीस जबाबदार कसे, ज्या भागात गुन्हा घडला त्या भागातील पोलीस चौकीतील मंडळी, गस्त करणारे पथक, बीट मार्शल, ड्युटी अधिकारी आणि संबंधित ठाणेदार यांची काही जबाबदारी नाही का, असाही प्रश्न गुंडलवारने विचारला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस