शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘कूपर’मध्ये रंगले चोर-पोलिस नाट्य, पोलिसांना गुंगारा देण्याचा कैद्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 06:42 IST

कैदी तौफिक शेख सहाव्या मजल्यावरून खालच्या दिशेने पळून गेला पण...

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कूपर रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी आणलेल्या सराईत गुन्हेगाराने सुरुवातीला बेडी टोचत असल्याचे सांगून पोलिसाला ती सैल करण्यास भाग पाडले. पुढे थंडी भरल्याचा बनाव करत अंगावर बेडशीट ओढून, हातातील बेडी सोडून पळ काढला. यादरम्यान एखादया चित्रपटातील दृश्याप्रमाणे कूपर रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यापासून आवारापर्यंत चोर पोलिसांमध्ये थरारक पाठलाग रंगला होता. आरोपीने पोलिसांना मारहाण करत त्यांच्या दिशेने दगडफेकही केली. यादरम्यान, झालेल्या झटापटीत दोन पोलिस जखमी झाले.  अखेर अर्ध्या तासाने त्याला पकडण्यास पोलिसांना यश आले.

विलेपार्ले पोलिस ठाण्यातील लुटीच्या गुन्ह्यातील आरोपी तौफिक शेख (२९) याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात ठेवण्यात आले होते. पोलिस हवालदार सुयोग्य वैद्य (५३) यांना त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. शेखची एमआरआय चाचणी करायची असल्याने, सहकारी पोलिस महाले रुग्णालयाच्या तळमजल्यावर असलेल्या एमआरआय ऑफिसमध्ये चौकशी करण्यासाठी गेले. यादरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास शेखने त्याच्या हातातील बेडी टोचत असल्याचे सांगितल्याने पोलिसाने ती थोडी सैल केली. त्यानंतर, शेखने थंडी वाजत असल्याचे सांगून अंगावर बेडशीट ओढून घेतली. बेडशीट खाली हळूहळू बेडी काढून टाकली. वैद्य यांना काही समजण्याच्या आधीच अंगावरील बेडशीट त्यांच्यावर फेकून शेखने पळ काढला. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांना धक्काबुकी केली.   झटापटीत त्यांच्या गणवेशावरील बॅच ओढून खाली फेकला.

तद्दन फिल्मी...

कैदी तौफिक शेख सहाव्या मजल्यावरून खालच्या दिशेने पळून गेला. वैद्य यांनी याबाबत अन्य सहकाऱ्यांना कळवले. काही पोलिसांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फिल्डिंग लावली. त्याचदरम्यान शेख रुग्णाच्या नातेवाईकांच्या विश्रांतीसाठी असलेल्या जागेच्या दिशेने पळताना दिसला. वैद्य आणि महाले यांनी त्याचा पाठलाग सुरूच ठेवला होता. बाहेर येताच, शेखने दोघांना दगड मारण्यास सुरुवात केली. “कोई सामने आएगा तो मैं किसीको जिंदा नही छोडूंगा” असे सांगितले. मात्र, त्यांनी अखेर त्याला पकडलेच. जवळपास अर्धा तास हा फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग सुरु होता. शेखला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल